Share

शेअर बाजारात गुंतवणूक करत आहात? नुकसान टाळण्यासाठी ‘या’ १० गोष्टी नेहमी लक्षात ठेवा

shear-market

सध्या रशिया-युक्रेन वादामुळे शेअर बाजारात प्रचंड अस्थिरता निर्माण झाली आहे. यामुळे गुंतवणूकदारांना मोठ्या तोट्याला सामोरे जावे लागले आहे. या अस्थिरतेमुळे नेमकी गुंतवणूक कुठे करावी? हा प्रश्न गुंतवणूकदारांना(Investor) पडला आहे. तसेच गुंतवणूक करत असताना कोणत्या चुका टाळाव्यात? याची माहिती मिळवणे गुंतवणूकदारांच्या दृष्टीने महत्वाचे आहे.(Investing in the stock market? Here are 10 things to keep in mind to avoid damage)

गेल्या वर्षभरात मोठ्या प्रमाणात नवीन डिमॅट खाती उघडण्यात आली आहेत. या लोकांनी शेअर बाजारात गुंतवणूक करत असताना काही गोष्टींची काळजी घ्यायला हवी. तसेच गुंतवणुकीसंदर्भातील काही गोष्टींची माहिती घ्यायला हवी. यामुळे शेअर बाजारात गुंतवणूक करत असताना चुका होणार नाहीत आणि नुकसान टाळता येईल.

शेअर बाजारात गुंतवणूक करत असताना सर्वात पहिल्यांदा कंपनीबद्दलची माहिती समजून घ्यावी. कंपनीचे नेमके उत्पादन काय आहे. कंपनीची प्रक्रिया कशी चालते? कंपनीचा शेअर बाजारातील आलेख कसा आहे? याबद्दल गुंतवणूकदारांनी माहिती मिळवणे गरजेचे आहे. या माहितीमधून तुम्हाला कंपनीची शेअर बाजारातील सध्य स्थिती कळते.

त्यानंतर पोर्टफोलिओबद्दल माहिती घेणे महत्वाचे आहे. तुमच्या पोर्टफोलिओमध्ये विविधता असायला हवी. तुम्ही एकाच कंपनीमध्ये मोठ्या रकमेची गुंतवणूक न करता अनेक कंपन्यांमध्ये छोट्या-छोट्या रकमेची गुंतवणूक करावी. वेगवेगळ्या क्षेत्रामधील शेअर्स विकत घेतले पाहिजेत. बँकिंग, फार्मा यांसारख्या क्षेत्रांमध्ये गुंतवणूक करावी. त्यामुळे गुंतवणूकदारांना मोठी जोखीम टाळता येईल.

आपल्याला नेहमीच दुसऱ्याचे अनुकरण करू नका, असे सांगितले जाते. पण शेअर बाजारामध्ये काही वेळा यशस्वी गुंतवणूकदारांचे अनुकरण करणे महत्वाचे असते. यशस्वी गुंतवणूकदारांचे अनुकरण केल्यामुळे तुम्हाला शेअर बाजारातील गुंतवणुकीची समज येऊ शकते. त्यामुळे यशस्वी गुंतवणूकदार शेअरची निवड कशापद्धतीने करतात, याची माहिती तुम्हाला मिळू शकेल.

भावनांच्या आधारे कधीच गुंतवणूक करू नका. कंपनीचा अभ्यास करून निर्णय घ्यायला हवा. शेअर बाजारात भावनांच्या आधारे निर्णय घेतल्यास नुकसान होण्याचे प्रमाण जास्त असते. गुंतवणूक करत असताना नुकसानाचा विचार करू नका. नुकसान झाले तर घाबरू नका. नुकसानाचा विचार न करता गुंतवणुकीसाठी पुढील संधी शोधा.

महत्वाच्या बातम्या :-
बाबरी शिवसैनिकांनीच पाडली, संजय राऊतांनी थेट पुरावेच देत दिले फडणवीसांना आव्हान
शिवरायांची समाधी फुलेंनी बांधली का टिळकांनी? टिळकांचे पणतू कुणाल टिळकांचा खळबळजनक खुलासा
VIDEO: पोलिस कर्मचाऱ्याने असा रॅप म्हणला की, लोकं झाले हैराण; म्हणाले, हा तर एमिनेमचा बाप निघाला

ताज्या बातम्या आर्थिक

Join WhatsApp

Join Now