ब्रेकिंग! अजित पवार यांची सीबीआय चौकशी करा, आता कार्यकारिणीत मांडला जाणार ठराव

मुंबई । राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. अजित पवार यांची सीबीआय चौकशी करा, असा प्रस्ताव भारतीय जनता पार्टीच्या प्रदेश कार्यकारणीत मांडला जाणार आहे. यामुळे आता चर्चा सुरू झाली आहे. भाजपने अजित पवार यांना सोबत घेऊन शपथविधी उरकला होता. आता त्याच्याविरोधात हा प्रस्ताव आल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

याबाबत परमबीर सिंह यांच्या लेटर बॉम्बनंतर माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी राजीनामा दिला होता. आता याच प्रकरणात उपमुख्यमंत्री अजित पवार आणि परिवहन मंत्री अनिल परब यांचीही सीबीआय चौकशी करावी, अशी मागणी भाजपच्या वतीने करण्यात येणार आहे. यामुळे सरकार पुढील अडचणी वाढणार आहेत.

महाविकास आघाडी सरकारमधील अनेक मंत्र्यांवर आरोप करण्यात आले आहेत. यामुळे अडचणी वाढत आहेत. गृहमंत्र्यांवरील वसुलीच्या आरोपांप्रमाणेच उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मंत्री अनिल परब यांच्यावर बडतर्फ पोलीस अधिकारी सचिन वाझे याने वसुलीचा आरोप केला आहे.

सध्या अनिल देशमुख यांची सीबीआय चौकशी करण्यात येत आहे. तशीच सीबीआय चौकशी अजित पवार आणि अनिल परब यांचीही करावी, अशी मागणी ही कार्यकारिणी करत आहे. यामुळे आता त्यांची चौकशी होणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

गेल्या काही दिवसांपासून भाजप महाविकास आघाडी विरोधात आक्रमक झाली आहे. तसेच सरकारमध्ये अंतर्गत देखील एकमेकांचे पटत नसल्याचे दिसून येत आहे. काँग्रेस स्वबळावर निवडणूक लढवणार असल्याचे सांगितले जात आहे. यामुळे सरकारमध्ये सर्वकाही ठीक नसल्याचे दिसून येत आहे.

येत्या काळात परमबीर सिंह आणि सचिन वाझे यांच्या लेटर बॉम्ब नंतर भाजप अजित पवार आणि अनिल परब यांच्या विरोधात आक्रमक पवित्रा घेणार हे स्पष्ट होत आहे. यामुळे या प्रकरणी आता विरोधक आक्रमक झाले आहेत.

ताज्या बातम्या

काय सांगता! ATM मध्ये १४०० रुपये काढायला गेलेल्या महिलेला लागली कोट्यावधीची लॉट्री, जाणून घ्या….

लग्नानंतर सासरी जाणाऱ्या नवरीला नवरदेवाच्या भावाने रस्त्यातच केली मारहाण; धक्कादायक कारण आले समोर

बाबो! रश्मिकाचा फॅन ९०० किलोमीटर प्रवास करुन आला तिला भेटायला, पण तिथं जाऊन भलतंच घडलं

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.