आतडे कापले, प्रायव्हेट पार्टमध्ये रॉड टाकला, साकीनाका पीडितेच्या मृत्यूनंतर चित्रा वाघ ढसाढसा रडल्या

मुंबईतील साकीनाका परिसरात एक धक्कादायक घटना घडली आहे. येथे महिलेवर बलात्कार केला गेला. या पीडित महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. धक्कादायक म्हणजे, या महिलेवर बलात्कार करुन तिच्या गुप्तांगात लोखंडी सळई घालण्याचा प्रकार घडला.

या महिलेची प्रकृती गंभीर होती. तिच्यावर मुंबईतील राजावाडी रुग्णालयात उपचार सुरु होते. तिथेच तिचा मृत्यू झाला. या प्रकरणावर राजकीय वर्तुळातून आता तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली जात आहे. यामुळे राजकीय वातावरण देखील तापले आहे.

या प्रकरणावर बोलताना भाजप नेत्या चित्रा वाघ या ढसाढसा रडल्या. त्यांना या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना अश्रू रोखता आले नाहीत. त्या म्हणाल्या, खरंतर मी आता निशब्द झाले, माझ्याकडे या विषयावर बोलायला शब्द नाहीत. ज्या पद्धतीने एका महिलेवर अत्याचार झाला, तो राक्षसी होता.

मी डॉक्टरांशी आता बोलले, मी तिला त्या ठिकाणी बघून आले तिचे आतडे कापले गेले, तिच्या प्रायव्हेट पार्टमध्ये रॉड टाकला गेला. ज्या पद्धतीमध्ये हे अत्याचार चालले ते कुठेतरी थांबायला पाहिजे. तसेच त्या म्हणाल्या, आता आमचे शब्द संपले.

महाराष्ट्र महिलांच्या सहनशीलतेचा अंत बघू नका, यामुळे महिलांचा सुरक्षतेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. या महिलेची विचारपूस करण्यासाठी चित्रा वाघ जात होत्या. मात्र त्यापूर्वीच त्या महिलेचा मृत्यू झाला. यामुळे त्या रडल्या.

मुंबईच्या साकीनाका परिसरात एका ३२ वर्षीय महिलेवर बलात्कार झाल्याची संतापजनक घटना १० सप्टेंबरला समोर आली. आरोपीने बलात्कारानंतर पीडितेच्या गुप्तांगात लोखंडी सळई टाकली. यामुळे एकच खळबळ उडाली होती.

यामुळे चित्रा वाघ संतापल्या, त्या म्हणाल्या, राज्याच्या महिला आयोगाला अध्यक्ष नाही. त्यामुळे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांना खुर्चीवर बसण्याचा अधिकार नाही, असा घणाघात चित्रा वाघ यांनी केला. अत्याचाराच्या या घटना थांबवण्यासाठी महिला कायदा आणायला हवा, अशी मागणी देखील त्यांनी केली आहे.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.