मी आता दारू पितो अन् पार्ट्या करतो, मी आता भ्रष्ट झालोय; गोविंदाच्या कबुलीने बाॅलीवूड हादरले

मुंबई : गोविंदा हा 90च्या दशकात बॉलिवूडमधील एक नामांकित अभिनेता म्हणून ओळखला जायचा. आजही गोविंदावर त्याचे चाहते तितकेच प्रेम करतात. मात्र आज तो बॉलिवूडमध्ये जास्त अ‍ॅक्टिव्ह नाही. दरम्यान, गोविंदाची एक मुलाखत चांगलीच गाजतं आहे.

‘आता मी पूर्णपणे बदललो आहे. आधीचा गोविंदा खूप पवित्र होता. पण आत्ता जो गोविंदा आहे तो कठोर झालाय, असे त्याने स्वत: सांगितले. मिळालेल्या माहितीनुसार या मुलाखतीत गोविंदाला त्याच्या आध्यात्मिक स्वभावाबद्दल विचारले. तू आताश: अधिक आस्तिक होताना दिसतोय, याकडे लक्ष वेधले असता, अजिबात नाही, नेमके याच्या उलट होतेय, असे गोविंदा म्हणाला.

तसेच पुढे या मुलाखतीत गोविंदानं आपल्या करिअरवर देखील भाष्य केलं. त्यावेळी त्यानं करिअरच्या काळातील एक अनुभव सांगितला. तो म्हणाला, एक काळ होता जेव्हा मी अध्यात्मिक होतो. वाईट सवयींपासून दूर राहायचो. पण आता माझ्या स्वभावात बराच बदल झाला आहे.

मी आता दारु पितो, पार्ट्या करतो, भ्रष्ट विचार करतो. माझी विचार करण्याची पद्धत आता बदलली आहे. आता मी केवळ व्यवसायिक अनुशंगानं विचार करतो. या इंडस्ट्रीनंच मला तसं बनवलं आहे, असे त्याने म्हंटले आहे. सध्या गोविंदाची ही मुलाखत चांगलीच चर्चेचा विषय बनली आहे.

महत्त्वाच्या बातम्या 

संध्याकाळी लोकांचे भांडे घसायची, रात्री कॉल सेंटरवर काम करायची; तिच मान्या आता झाली मिस इंडीया रनरअप

‘तारक मेहता का उल्टा चश्मा’मधील तारक मेहताची खऱ्या आयूष्यातील पत्नी आणि मुलगी आहेत खुपच सुंदर

अन् गृहराज्यमंत्र्यांनी छत्रपती उदयनराजेंना भररस्त्यावरचं घातला मुजरा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.