सावधान! कोरोना लसीला संघटित गुन्हेगारी क्षेत्राकडून धोका; इंटरपोलने दिला इशारा

मुंबई | देशात कोरोना विषाणूचा हाहाकार सुरूच आहे. अशातच सर्वांचे लक्ष आता कोरोना लसीकडे लागले आहे. अमेरिका, ब्रिटनमध्ये तर कोरोना लसीकरण सुरु करण्यास मान्यताही देण्यात आली आहे. यामुळे आता आता कोरोनावर लसी येत असल्याने मोठा दिलासा मिळाला आहे.

अशातच एक सावधान करणारी माहिती समोर येत. जागतिक सुरक्षा यंत्रणा इंटरपोलने कोरोना लसीबाबत मोठा इशारा दिला आहे. या इंटरपोलचे मुख्यालय फ्रान्समध्ये आहे. याचबरोबर इंटरपोलचे १९४ देश सदस्य आहेत. या सर्व देशांना इंटरपोलने सावध राहण्याचे आदेश दिले आहेत.

वाचा इंटरपोलने काय दिलाय इशारा…
इंटरपोलने म्हंटले आहे की, कोरोना लसीला संघटित गुन्हेगारी क्षेत्राकडून धोका आहे. हे गुन्हेगार कोरोना लसीला प्रत्यक्ष किंवा ऑनलाईन पद्धतीने धोको पोहोचवू शकतात. हे गुन्हेगार कोरोनाची बनावट लस तयार करून काळ्या बाजारात आणू शकतात असा इशारा त्यांनी दिला आहे.

मॉडर्ना लस कोरोनावर १००% प्रभावी…
अमेरिकेतील मॉडर्ना कंपनीने कोरोना लशीबाबत एक दिलासादायक माहिती दिली आहे. ट्रायलमध्ये आपली लस ९४.१ % परिणामकारक असल्याचे मॉडर्नाने सांगितले आहे. तर गंभीर कोरोनावर ही लस १०० टक्के प्रभावी ठरली असल्याचा असा दावा देखील करण्यात आला आहे.

याबाबत मॉडर्ना कंपनीने तिसऱ्या टप्प्यातील अहवाल जारी केला आहे. यात दिलेल्या माहितीनुसार ३०.००० लोकांवर लशीची चाचणी केली. त्यामध्ये  १९६ कोरोना रुग्णांचा समावेश होता. या रुग्णांवर ही लस १०० टक्के परिणामकारक असल्याचे समजत आहे.

कोरोना लस वाटपासाठी मोदी सरकारने तयार केला प्लॅन…
कोरोना लस वेळेत सर्वसामान्यांपर्यंत पोहोचावी यासाठी केंद्र सरकार आणि राज्य सरकार आरखडा तयार करण्याच्या तयारीत आहे. सरकार प्रत्येक राज्यात ब्लॉक स्तरावर ब्लॉक टास्क फोर्स तयार करेल. याबाबत बुधवारी सरकारने मोठा निर्णय घेतला आहे.

महत्त्वाच्या बातम्या
डॉ. शीतल आमटे – करजगी यांच्या मृत्युच्यादिवशी नेमकं काय घडलं होतं? घ्या जाणून
हेमा मालिनी- धर्मेंद्र पुन्हा झाले आजी-आजोबा; घरात एकाच वेळी डबल धमाका
‘एमडीएच’ मसालेचे मालक धर्मपाल गुलाटी यांचं निधन

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.