अजित पवार (Ajit Pawar): एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीमुळे राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार कोसळले आणि शिंदे – फडणवीस सरकार स्थापन झाले. त्यानंतर माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे विरोधी नेतेपक्षाची जबाबदारी देण्यात आली. परंतू, अजित पवार यांच्याकडे विरोधी पक्षाची जबाबदारी दिल्याने राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील नाराज असल्याचे समोर येत आहे.
या नाराजीमुळे त्यांनी अजित पवार यांच्याकडे विरोधी पक्षाची जबाबदारी देण्यासाठी रीतसर पत्रही दिले नव्हते. त्यासाठी राष्ट्रवादीचे नेते प्रफुल पटेल यांना जयंत पाटलांना फोन करावा लागला होता. जयंत पाटील यांनी अनेक वर्षांपासून गृह, वित्त, ग्रामीण विकास यासारखे अनेक खाते सांभाळले आहेत. तसेच ते राष्ट्रवादी काँग्रेसमधील सर्वात अनुभवी नेत्यांपैकी एक असून गेल्या चार वर्षांपासून त्यांच्याकडे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्षपदही आहे.
अजित पवारांकडे विरोधी पक्षनेतेपद दिल्याबद्दल ते अत्यंत नाराज आहेत. म्हणूनच त्यांनी अजित पवारांना विरोधी पक्षनेतेपदी नियुक्त करण्याचे पत्र देण्यासही नकार दिला. त्यामुळे राष्ट्रवादीच्या ५३ पैकी ३६ आमदारांनी अजित पवार यांना विरोधी पक्षनेते म्हणून पाठिंबा देण्याच्या पत्रावर आधीच स्वाक्षरी केली आहे, असा दोनदा फोन करून राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांनी जयंत पाटील यांना आठवण करून दिली.
अजित पवार यांना विरोधीपक्ष नेतेपदासाठी पाठिंबा देणारे पत्र मागण्यासाठी धनंजय मुंडे जयंत पाटील यांच्याकडे गेले होते. तेव्हा आपण थोड्याच वेळात पत्र देऊ असे पाटील म्हणाले, परंतु त्यांनी पत्र दिले नाही. अखेर प्रफुल पटेल यांनी जयंत पाटील यांना दोन वेळा फोन केला. नाराज असल्यानंतर जयंत पाटील भाजपमध्ये जाणार असल्याचीही चर्चा होती. परंतु आपण राष्ट्रवादी सोडून जाणार नसल्याचे जयंत पाटील यांनी स्पष्ट केले.
३ जुलै रोजी आमदारांची बैठक पार पडली, त्यात अजित पवार यांच्याकडे विरोधी पक्षनेतेपदाची जबाबदारी देण्याचा निर्णय झाला. तसेच दुसर्याच दिवशी आपण विधासभा अध्यक्षांकडे तसे पत्र दिल्याचेही जयंत पाटील यांनी सांगितले. मला विरोधी पक्षनेते व्हायचं आहे, परंतु अजित पवार यांना या पदावर नियुक्त करण्याच्या निर्णयास मी पाठिंबा दिला असल्याचेही ते म्हणाले.
महत्वाच्या बातम्या
BJP: दिपक केसरकरांना भाजपने झापले, शिंदे गटाला दिला इशारा; त्यांच्या तोंडाला आवर घाला नाहीतर…..
Amit Thackeray: ‘आपल्याला प्रत्येक निवडणूक जिंकायचीय, कोणतीही निवडणुक लागली की मला बोलवा’; अमित ठाकरेंचे आवाहन
Farmani Naaz: ‘हर हर शंभू’ गाणारी फरहानी नाज हिंदू धर्म स्वीकारणार? स्वतःच केला खुलासा
India: जगातले सगळे देश त्यांच्या प्रतिमेसाठी कट्टर होतात आपण केव्हा कट्टर भारतीय होणार? मराठी अभिनेत्याचा सवाल