पुजाला न्याय मिळवूण देण्यासाठी बहिण आली धावून; माझी बहिण वाघीण होती, तिच्या सु.साईड मागे मोठी..

मुंबई | पुण्यात आत्मह.त्या करणाऱ्या पुजा चव्हाण प्रकरणाला नवं वळण मिळाले आहे. आता पुजाची बहिण दिया चव्हाण याप्रकरणी समोर आली आहे. तिने सोशल मीडियावर पोस्ट केली आहे. यामध्ये पुजाच्या मृत्यूबाबत तर्क लावणाऱ्यांचा दियाने समाचार घेतला आहे. माझी बहिण वाघिण होती. ती असं करु शकत नाही. तिच्या आत्मह.त्येसाठी कुठले तरी कारण असेल असं तीने लिहिले आहे.

पुजाची बहिण दियाची पोस्ट-

दोन दिवसांपासून मी पाहत आहे की तुम्ही काही ही पोस्ट टाकत आहात. काही विचारपूस न करता. ती फक्त परळी वैजनाथची नाहीतर पूर्ण महाराष्ट्राची वाघीण होती माझी बहिण. पुजा लहू चव्हाण एवढी कमजोर नव्हती की ती असं काही करेल. आणि हे तुम्हालापण चांगलेच माहित आहे. मला आजसुद्धा विश्वास होत नाही तिने सुसाईड केले आहे.

तिने जरी सुसाईड केले असेल तर मोठीच कोणती तरी गोष्ट असेल. दीदीने सर्वांना मदत केली आहे. काही विचार न करता तिने फक्त बंजारा समाज नाहीतर सर्वांना पाठिंबा दिला आहे. जेवढे होईल तेवढी तिने मदत केली आहे. मी तिची लहान बहीण आहे हे माझं नशीब आहे.

ती आज आपल्या सोबत नाही याचं जर तुम्हाला दु:ख होत असेल, तर विचार करा आम्ही कसं स्वत:ला सांभाळत आहोत. मला आधीच याचा त्रास सहन होत नाही. मम्मी पप्पाला सांभाळायचं आहे अजून. आणि तुम्ही अशा पोस्ट टाकत आहेत. निदान तिला न्याय मिळू शकत नाहीतर अशा पोस्ट करुन आम्हाला त्रास तर देऊ नका. तिला स्वर्गात शांतीने राहू द्या, ती जर हे सर्व पाहात असेल तर तिला किती त्रास होत असेल विचार करा.

याप्रकरणी भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी शिवसेनेचे नेते मंत्री संजय राठोड यांच्यावर थेट गंभीर आरोप केले आहेत. संजय राठोड यांच्यावर गुन्हा दाखल करा, अशी मागणी चित्रा वाघ यांनी केली आहे. पोलिसांनी वाट न बघता थेट संजय राठोड यांच्या मुसक्या आवळा, असे चित्रा वाघ म्हणाल्या आहेत.

दरम्यान, पुण्यातील वानवडी येथे पुजा चव्हाण नावाच्या तरुणीने आत्मह.त्या केली. २३ वर्षीय असलेल्या या तरुणीने रविवारी (ता.७) रात्री इमारतीवरून उडी मारून आत्मह.त्या केली आहे. ही तरुणी मुळची बीड जिल्ह्यातील परळीची आहे. या युवतीचे राज्य सरकारमधील एका मंत्र्याशी संबंध असल्याची चर्चा सोशल मीडियावर सुरू आहे.

महत्त्वाच्या बातम्या-
पूजा चव्हाण आत्महत्या! चित्रा वाघ यांनी शिवसेनेच्या ‘या’ बड्या नेत्यावर केले गंभीर आरोप, म्हणाल्या…
मंत्री कार्यकर्त्याला सांगतात ‘आधी त्या मुलीचा मोबाईल ताब्यात घे’; आॅडीओ क्लिप व्हायरल
पुण्यात आत्मह.त्या केलेल्या तरुणीचे राज्यातील ‘या’ मंत्र्यासोबत कनेक्शन

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.