वाह! ६० म्हशींचा सांभाळ अन् २ मजल्यांचा गोठा, पारनेरच्या श्रद्धाचा थक्क करणारा प्रवास!

 

मुलींना आजही काही ठिकाणी दुय्यम स्थान दिले जाते, त्यामुळे मुलांकडेच एका कुटुंबप्रमुख म्हणून पाहिले जाते. मुलंच कुटुंबाचा सांभाळ करू शकतात, असा दृष्टिकोन आजही समाजातील लोकांच्या डोक्यात आहे.

मात्र आज जग बदलत चालले आहे, मुली त्यांच्या कामाच्या आणि कौशल्याच्या बळावर आज समाजात एक वेगळी ओळख निर्माण करत चालल्या आहे. अशीच गोष्ट आहे श्रद्धा ढवण या तरुणीची.

अहमदनगरच्या पारनेर तालुक्यात राहणारी श्रद्धा एक दोन नाही तर तब्बल साठ म्हशींचा सांभाळ करत, कुटुंब सांभाळत आहे. विशेष म्हणजे तिचे शिक्षण सुरू असून ती घर सांभाळण्यासाठी ती तिच्या आईला मदत करत आहे. श्रद्धा सध्या TY.Bsc मध्ये शिकत आहे.

निघोजमध्ये राहणाऱ्या श्रद्धाचे वडील अपंग आहे. श्रद्धाला एक भाऊ एक बहीण आहे. बहीण पुण्यात शिक्षण घेत आहे, तर भाऊ दहावीचे शिक्षण पूर्ण करत आहे. घरात अजून कोणी नसल्याने घर सांभाळण्याचा पूर्ण भार आईवर येत होता. त्यामुळे आता श्रद्धा पण आईला घर सांभाळण्यात मदत आहे.

२ म्हशींचा सांभाळ करत श्रद्धाने सुरुवात केली होती, आता हळूहळू श्रद्धा ६० म्हशींचा सांभाळ करत आहे. श्रद्धा आता पूर्णपणे आत्मनिर्भर बनली असून घराजवळच तिने म्हशींसाठी २ मजली गोठा बांधला आहे. २ मजली गोठा बनवण्याचा जिल्ह्यात पहिलाच उपक्रम आहे.

पहाटे लवकर उठणे स्वतःचे आवरणे. पुढे म्हशींना अंघोळ घालणे, गोठा साफ करणे, म्हशींचे दूध काढणे. पूढे दूध काढल्यानंतर ते दूध डेअरीपर्यंत पोहचवण्याचे काम पण श्रद्धाच करते. इतकेच काय तर पेंड आणि खाद्य आणण्याचे काम श्रद्धा करते. या सोबतच घेत असलेल्या शिक्षणाचा अभ्यास पण ती संध्याकाळी करत असते.

वडिलांनंतर मुलगाच घर सांभाळणार आहे, असे म्हणत मुलांनाच कुटुंब प्रमुख म्हणून पाहिले जाते. पण श्रद्धाने मुली देखील आपले घर सांभाळू शकता हे सिद्ध करून दाखवले आहे.

स्वतःचे शिक्ष पूर्ण करत घरात हातभार लावणाऱ्या श्रद्धाचा तिच्या आईला पण अभिमान वाटतो.आज श्रद्धाचे पूर्ण गाव कौतुक करत आहे. मुलगा आपल्या कुटुंबाची जबाबदारी घेत असतो, पण मुलीदेखील करू शकतात, याचे उत्तम उदाहरण श्रद्धा ढवण आहे. श्रद्धाची ही गोष्ट अनेकांना प्रेरणा देणारी आहे.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.