संध्याकाळी लोकांचे भांडे घसायची, रात्री कॉल सेंटरवर काम करायची; तिच मान्या आता झाली मिस इंडीया रनरअप

 

जीवनात यशस्वी होणे खुप कठिण काम असते, पण तुम्ही जर ध्येय निश्चित करुन ते मिळवण्यासाठी अथक मेहनत घेत असाल, तर एक दिवस त्यात तुम्ही नक्की यशस्वी होत असतात. आजची गोष्टही अशीच काहीशी आहे.

उत्तर प्रदेशच्या मान्या सिंग नावाच्या तरुणीने वीएलसीसी फेमिना मिस इंडीया २०२० रनरअपचा पुरस्कार जिंकला आहे. मान्याचे वडील एक रिक्षाचालक आहे. एका रिक्षाचालकाच्या मुलीने रनरअप पुरस्कार मिळवल्याने सर्वत्र तिचीच चर्चा रंगली आहे.

मान्याने आपल्या आयुष्यात खुप संघर्ष केला आहे, असे आतापर्यंत तिच्या आयुष्यात घडलेल्या घटनांवरुन समजते. मान्या मूळची देवरिया जिल्ह्यातली आहे. मान्या एका सामान्य कुटुंबातून येते. तिचे वडीलांचे नाव ओमप्रकाश सिंग असे असून ते एक रिक्षाचालक आहे.

सामान्य कुटुंबात जन्म घेतलेल्या मान्याचे शिक्षण देसही देवरिया परिसरातील लोहीया इंटर महाविद्यालयात झाले आहे. सध्या तिचे वडील मुंबईत रिक्षा चालवतात, तर तिची आई टेलरींग काम करते.

मान्याच्या शिक्षणासाठी अनेकदा तिच्या आईने स्वता:चे दागिने गहाण ठेवले होते, त्यामधून मिळालेल्या पैशातून तिची आई मान्याची फि भरायची. मान्याने सुद्धा तिच्या शिक्षणासाठी खुप कष्ट घेतले होते. ती पैसे वाचवण्यासाठी ती अनेक किलोमीटर चालत जायची.

ती लहानपणापासूनच शिक्षणात खुप हुशार होती. १२ वीमध्ये तिला बेस्ट स्टुडेंटचा पुरस्कारही मिळाला आहे. डिसेंबर २०२० मध्ये मान्याची मिस उत्तर प्रदेश म्हणून निवड झाली होती. आता मुंबईमध्ये १० फेब्रुवारीला झालेल्या वीएलसीसी फेमिना मिस इंडीया २०२० रनरअपची ती विजेती ठरली आहे.

आपल्या परिस्थिची जाणीव तिला होती, त्यामुळे तिने कमी वयात काम करण्यास सुरु केले होते. संध्याकाळी लोकांच्या घरी ती भांडे धुवायला जायची तर रात्री कॉल सेंटरमध्ये काम करायची. इतका संघर्ष करुन तिने आपले ध्येय गाठले आहे. तिचा हा संघर्ष आता अनेकांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.