नारायण राणेंच्या अडचणी वाढल्या! ‘आधिश’ बंगल्याचा तहसीलदारांकडून पंचनामा

मुंबई : माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्या जुहू येथील ‘अधिश’ या बंगल्याची पाहणी आज अंधेरी तहसील कार्यालयामार्फत करण्यात येणार आहे. याबाबत काही दिवसांपूर्वी सामाजिक कार्यकर्ते प्रदीप भालेकर यांनी महाराष्ट्र कोस्टल झोन मॅनेजमेंट अॅथाॅरिटीकडे तक्रार केली होती.

सीआरझेड-2 कायद्यानुसार समुद्रापासून ५० मीटरच्या आत कुठल्याही प्रकारचं बांधकाम करता येत नाही. तरी देखील राणे यांनी हा अनधिकृत बंगला बांधल्याची तक्रार भालेकर यांनी केली होती.

भालेकर यांनी केलेल्या तक्रारीनंतर ‘एमसीझेडए’ ने “मुंबई उपनगर जिल्हाधिकारी” आणि “महानगरपालिका आयुक्त” यांना नोटीस बजावली” होती. आता संबंधितांच्या उपस्थितीत राणे यांच्या ‘अधिश’ या बंगल्याचा आज दुपारी पंचनामा करण्यात येणार आहे.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांचा जुहू येथील ‘अधिश’ बंगला अनधिकृत असून तो पाडण्यासंदर्भातची याचिका मुंबई हायकोर्टात दाखल करण्यात आली होती. याचिकाकर्ते भालेकर यांनी ही जनहित याचिका दाखल केली होती.

तसेच सीआरझेड कायद्याचं उल्लंघन करून नारायण राणे यांनी जुहू येथे २०११ मध्ये या बंगल्याच्या बांधकामास सुरुवात केली होती. हे काम २०१२ मध्ये पूर्ण झाले. आता हा ७ मजली बंगला ‘अधिश’ नावानं ओळखला जातो.

महत्त्वाच्या बातम्या 

मोठी बातमी! मनसुख हिरेन प्रकरणाचा तपास थांबवा; न्यायालयाचा एटीएसला आदेश

निलेश राणेंचा घणाघात; ‘भाई जगताप असा टपोरी ज्याला ‘भाई’ बनायचं होतं पण डरपोक…’

‘नागपुरमधील आर्किटेक्ट एकनाथ निमगडे यांच्या हत्येमागे फडणवीस आणि भाजपचा हात’

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.