वाझे प्रकरणात संजय राऊतांच्या चौकशीची कॉंग्रेस नेत्याची मागणी; राजकारणात खळबळ

मुंबई : उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराजवळ स्फोटकांनी भरलेली स्कॉर्पिओ आणि मनसुख हिरेन मृत्यूप्रकरणात NIA ने सचिन वाझे यांना अटक केली आहे. NIA कडून कसून तपास केला जात असून, अटक झाल्यापासून सचिन वाझे दररोज नवनवीन खुलासे करत आहे.

वाझे प्रकरणावरून राज्यातील राजकीय वातावरण देखील चांगलेच तापले आहे. तर दुसरीकडे याच मुद्द्यावरून कॉंग्रेसने शिवसेनेवर टीकेचे बाण सोडले आहेत. काँग्रेस नेते संजय निरुपम यांनी शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे.

याबाबत निरुपम त्यांच्या ट्विटमध्ये म्हणतात, “संजय राऊत यांनी सांगितले की ते सचिन वाझे यांना पोलिसांमध्ये परत घेण्याच्याविरोधात होते. पहिल्यांदा त्यांनी वाझे प्रामाणिक आणि सक्षम अधिकारी असल्याचं म्हटलं होतं.’

दरम्यान, ‘संजय राऊत यांनी वाझे कोणत्या नेत्यांच्या खांद्यावर बसून पोलीस दलात परत आले, राष्ट्रीय तपास यंत्रणेनं राऊत यांना उचलून चौकशी करुन त्यांच्यामागील सूत्रधारापर्यंत पोहोचावं, असे संजय निरुपम यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हंटले आहे.

वाचा काय म्हणाले होते संजय राऊत…
जेव्हा सचिन वाझेंना परत पोलीस सेवेत घेतलं होतं, तेव्हाच काही वरीष्ठ आणि प्रमुख नेत्यांशी बोलताना मी म्हणालो होतो की, त्यांच्यामुळे पुढे अडचणी निर्माण होतील. या अधिकाऱ्याचा स्वभाव आणि काम करण्याची पद्धत पाहाता आपल्यापुढे अडचणी निर्माण करू शकतील.

हे बोललो, ते नेतेही सांगतील. कोणताही अधिकारी वाईट नसतो, त्याला परिस्थिती वाईट बनवत असते. ज्या पद्धतीने हे प्रकरण घडलं, त्यावर कदाचित कुणाचं नियंत्रण राहिलं नसेल. यातून अनेक मंत्र्यांनाही धडा मिळाला असेल असं संजय राऊत म्हणाले होते.

महत्त्वाच्या बातम्या 

फिल्मी व खऱ्या पोलीसांत जमीनअस्मानाचा फरक; त्यामुळे पोलीसांना ‘असं’ काम करावं लागतं – उद्धव ठाकरे

माणुसकीला काळीमा! हेल्मेट नव्हते म्हणून पतीला शिक्षा, गर्भवती पत्नीला ३ किमी चालावे लागले

“देवेंद्र फडणवीस शब्दाला जगणारे; त्यांच्या शब्दावर माझा विश्वास”

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.