परमबीर सिंग यांची प्रॉपर्टी किती, जनतेला कळू द्या; राष्ट्रवादीची मोठी मागणी

मुंबई : दोन दिवसांपूर्वी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप करणारे राज्याचे पोलीस महासंचालक परमबीर सिंग यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करीत या आरोपांची केंद्रीय अन्वेषण विभागामार्फत चौकशी करण्याचा आदेश द्यावा, अशी मागणी केली आहे.

याचबरोबर राष्ट्रवादीकडून परमबीर सिंगांवर पलटवार केला जात आहे. ‘राज्य सरकारला माझी विनंती आहे की या IPS अधिकाऱ्याची किती प्रॉपर्टी आहे याचा शोध घ्यावा. अधिकारी प्रामाणिक काम करत होते की नाही हे महाराष्ट्रातील जनतेला कळू द्या,’ अशी विनंती राष्ट्रवादीचे आमदार शशिकांत शिंदे यांनी केली आहे.

ते याबाबत माध्यमांशी बोलत होते. ते म्हणाले, ‘माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांची बदली ही त्यांच्यावर आरोप झाल्यानंतर केली. तरीदेखील परमबीर सिंग यांनी याचिका दाखल केली आहे. यामागे कुणाचा हात आहे हे सर्वज्ञात आहे. दिल्लीला गेल्यानंतर एवढा बदल कसा होतो” असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

दरम्यान, राज्याचा राजकारणात शनिवारी रात्री भूकंप आला होता. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंगांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप असलेले पत्र मुख्यमंत्री कार्यालयाला पाठविले होते.

यामध्ये निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे याला देशमुखांनी मुंबईतील पब, बार आदी आस्थापनांकडून महिन्याला १०० कोटी रुपये वसुलीचे काम दिले होते. गृहमंत्री पोलिसांवर दबाव टाकत असल्याचे परमबीर यांनी मुख्यमंत्री, शरद पवार, अजित पवारांना सांगितले होते, असा आरोप केला होता.

महत्त्वाच्या बातम्या 

“खासदारकीचा राजीनामा द्या आणि मग राज्यात राष्ट्रपती राजवटीच्या गप्पा करा”

डेलकर आत्महत्या प्रकरणी भाजपा नेत्यांना अडकवण्यासाठी होता देशमुखांचा दबाव – परमबीर सिंग

मनसुख हिरेन प्रकरणाचे गुजरात कनेक्शन उघड? व्हॉट्सऍप कॉलमुळे दोन आरोपी ATS च्या जाळ्यात

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.