अमरावतीत(Amaravti) छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा महापालिकेकडून हटवण्यात आल्याने राजकीय वातावरण चांगलेच तापले होते. त्यामुळे संतप्त झालेल्या कार्यकर्त्यांनी आज महापालिका आयुक्त प्रवीण आष्टीकर(Pravin Ashtikar) यांच्या अंगावर शाई फेकली आणि निषेध व्यक्त केला आहे. आयुक्तांवर शाई फेकणारे कार्यकर्ते आमदार रवी राणा(Ravi Rana) यांचे समर्थक असल्याची चर्चा होत आहे.(ink thrown at amravati muncipal commisioner pravin ashtikar)
आज दुपारी काही महिला कार्यकर्त्यांनी अमरावती महापालिकेत येऊन जोरदार घोषणाबाजी केली. त्यानंतर महिला कार्यकर्त्यांनी थेट अमरावती महानगर पालिकेचे आयुक्त प्रवीण आष्टीकर यांना जाब विचारला. यावेळी संतप्त झालेल्या महिला कार्यकर्त्यांनी पालिकेचे आयुक्त प्रवीण आष्टीकर यांच्या अंगावर शाईफेक केली.
अचानक हा प्रकार घडल्याने महापालिका आयुक्त प्रवीण आष्टीकर काही काळ गोंधळले होते. अमरावती महानगरपालिकेच्या सुरक्षा रक्षकांनी तात्काळ प्रसंगावधान दाखवत महिला कार्यकर्त्यांना कार्यालयाबाहेर काढले. या घटनेमुळे अमरावती शहरातील वातावरण अधिक तापण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
अमरावती महानगरपालिकेचे आयुक्त प्रवीण आष्टीकर आज दुपारी पालिकेच्या आवारात कचऱ्याची पाहणी करत होते. त्यावेळी ही घटना घडली आहे. दोन महिला पालिकेच्या आवारात आल्या. या महिलांना पालिकेच्या सुरक्षा रक्षकांनी अडवण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी एका महिलेने आपल्या पिशवीमधून एक बॉटल काढली.
या बॉटलमध्ये काहीतरी असल्याचे लक्षात येताच पालिका आयुक्त प्रवीण आष्टीकर सतर्क झाले. त्यांनी त्या ठिकाणाहून बाजूला जाण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी आयुक्तांना या महिलांनी घेरले आणि अंगावर शाई फेकली. तेवढ्यात सुरक्षारक्षकांनी धाव घेत आयुक्तांचा बचाव करण्याचा प्रयत्न केला. त्यांनतर या महिला त्या ठिकाणाहून पळून गेल्या.
या प्रकारामुळे अमरावती महापालिकेत एकच खळबळ उडाली आहे. आमदार राणा यांनी अमरावतीमधील राजाराम पेठ येथील उड्डाणपुलाजवळ छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवला होता. या पुतळ्याला परवानगी द्यावी, अशी मागणी आमदार राणा यांनी केली होती. कोणतीही परवानगी न घेता पुतळा बसवल्याने तो महापालिकेने काढला. त्यावरून अमरावती शहरातील वातावरण चांगलचं तापलं आहे.
महत्वाच्या बातम्या :-
IND vs WI: वेस्ट इंडिज संघाला दुसऱ्या सामन्यात धूळ चारत टीम इंडियाने जिंकली वनडे सिरीज
चीनमध्ये बनवला आहे स्टॅच्यू ऑफ इक्वॅलिटी, 1600 तुकडे करून आणला भारतात, किंमत वाचून अवाक व्हाल
कर्नाटक हिजाब प्रकरणाचे पडसाद महाराष्ट्रात; मुंबई, मालेगावात मुस्लिम तरुण-तरुणी रस्त्यावर