माझी दुखापत गंभीर नव्हतीच, त्यावरून झालेला वाद…;रोहित शर्माचा मोठा खुलासा

मुंबई । भारतीय क्रिकेट संघाचा सलामीवीर रोहित शर्माला आयपीएल दरम्यान झालेल्या दुखापतीवरच्या वादावर रोहित शर्माने मौन सोडले आहे. माझ्या दुखापतीवरुन झालेला वाद गोंधळात टाकणारा आणि मनोरंजक असल्याची प्रतिक्रिया रोहित शर्मा याने दिली आहे.

तो म्हणाला, मला झालेली दुखापत गंभीर नव्हती आणि मी ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी फिट होईन, हे माहिती होते. यामुळे त्याला टीममध्ये का वगळण्यात आले हा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

नुकत्याच झालेल्या आयपीएलमध्ये रोहितच्या मांडीला दुखापत झाली होती, यानंतर त्याची ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी निवड झाली नाही. पण दुखापत झालेली असतानाही रोहित सराव करत होता, तसेच काही काळ विश्रांती घेतल्यानंतर तो पुन्हा मॅच खेळण्यासाठी उतरला.

मी ऑस्ट्रेलियाला जाईन का नाही, याबाबत कोण काय बोलते त्याला मी महत्त्व देत नाही. दुखापत झाली तेव्हा पुढचे दोन दिवस मी याचा विचार केला की येत्या 10 दिवसात मी खेळू शकेन का नाही. जोपर्यंत तुम्ही मैदानात जात नाही, तोपर्यंत शरीर तुम्हाला साथ देत आहे का नाही, ते समजणार नाही.

माझी प्रत्येक दिवशी दुखापत बरी होत होती, त्यामुळे मी खेळू शकतो, हा विश्वास वाटला. आणि याबाबत प्ले-ऑफआधीच मी खेळू शकलो, जर काही त्रास झाला असता, तर मी प्ले-ऑफ खेळलोच नसतो, असे वक्तव्य रोहितने केले आहे.

या प्रकरणानंतर रोहित आयपीएल खेळण्यासाठी फिट आहे, पण ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी फिट कसा नाही? असे प्रश्न उपस्थित करण्यात आले होते. यानंतर रोहितची ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठीच्या टेस्ट टीममध्ये निवड झाली. गेल्या काही दिवसांपासून यावरून अनेकांनी नाराजी व्यक्त केली आहे. अशातच रोहित शर्माला कर्णधार करण्याची मागणी वाढू लागली आहे.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.