अरे वा! कोरोनाची लस टोचून घ्या आणि सोन्याची नथ घेऊन जा

मुंबई : राज्यात कोरोनाबाधितांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढत होत असताना दुसरीकडे कोरोना लसीकरण मोहिमही जोरदार सुरु आहे. महाराष्ट्रात काल एकाच दिवशी ४ लाख ६२ हजार ७३५ नागरिकांना कोरोनाची लस देण्यात आली आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या नावावर राष्ट्रीय विक्रमाची नोंद झाली आहे.

तर दुसरीकडे अनेकजण कोरोना लसीचे दुष्परिणाम असल्याचे पाहून लस घेण्यास टाळाटाळ करत आहेत. अशातच कोरोना लसीकरण वाढावे यासाठी गुजरातच्या सोनारांनी एक भन्नाट आयडिया लढविली आहे.

गुजरातच्या राजकोटमध्ये कोरोना लसीकरण केंद्रावर येणाऱ्या नागरिकाला एक खास गिफ्ट देण्यात येत आहे. यासाठी त्यांनी स्वत:च्या पुढाकारातून कँप लावला आहे. यामध्ये महिलांसाठी सोन्याची नथ गिफ्टम्हणून दिली जात आहे. तर पुरुषांसाठी हँडब्लेंडर देण्यात येत आहे.

चिंता वाढली! २४ तासांत ९३ हजार नवीन रुग्ण…
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने मागील २४ तासांतील करोना रुग्णसंख्येचा आणि लसीकरणाची माहिती प्रसिद्ध केली आहे. देशभरात २४ तासांत ९३ हजार २४९ जणांना करोनाची लागण झाल्याचं निष्पन्न झालं आहे.

तर ५१३ रुग्णांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. याच कालावधीत ६० हजार ४८ रुग्ण करोनावर मात करून घरी परतले आहेत. सध्या देशात ६ लाख ९१ हजार ५९७ रुग्ण उपचार घेत असून, आतापर्यंत १ लाख ६४ हजार ६२३ नागरिकांचा मृत्यू झाला आहे.

महत्त्वाच्या बातम्या 

केकेआरचा खेळाडू निगेटिव्ह काय आला? भाऊने तर डान्सच सुरू केला; पहा व्हिडीओ

लोकांचं पोट भरावं यासाठी १ रुपयाला इडली विकते, त्या अम्माला आता आनंद महिंद्रा देणार पक्के घर

अन् कोरोना निगेटिव्ह आला म्हणून भज्जीने केला भांगडा; व्हिडीओ होतोय तुफान व्हायरल

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.