“सुरुवातीला लोक म्हणायचे, शिवसेना ५-६ महिन्यांत बंद पडेल पण आज…”

मुंबई । राज्यात अनेक प्रयत्न करून तीन वेगवेगळ्या पक्षांची सरकार स्थापन करण्यात आले. महाविकास आघाडी सरकार स्थापन करण्यात आली त्यावेळी अनेकांनी असे दावे केले की, ही सरकार जास्त दिवस टिकणार नाही. शिवसेनावरही टीका करण्यात आली. शिवसेनेचा आज ५५ वा वर्धापन दिन असून त्यानिमित्ताने पक्षाच्या नेतेमंडळींकडून आणि इतर राजकीय पक्षांकडून देखील शिवसेनेला शुभेच्छा दिल्या जात आहेत.

या पार्श्वभूमीवर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी ही भाष्य केले आहे. शिवसेनेच्या गेल्या ५५ वर्षांच्या प्रवासाविषयी भूमिका मांडली आहे. मराठी माणसाचा विषय शिवसेनेने कधीही दूर केलेला नाही. हिंदुत्व आणि मराठी हे दोन्ही विषय शिवसेनेसाठी महत्त्वाचे राहिले आहेत. आज हिंदुत्वाचा बुलंद आवाज म्हटले की जगभरातल्या हिंदुंसमोर शिवसेनाच येते. शिवाय मराठी माणसाला आजही शिवसेनाच आपला आधार वाटते, असे संजय राऊत म्हणाले आहे.

तसेच, सुरुवातीच्या काळात शिवसेना ५ ते ६ महिन्यांत बंद होईल, असे म्हटले जात होते, असे देखील त्यांनी सांगितले. संजय राऊत यांनी शिवसेना हा देशाच्या राजकारणातला मोठा चमत्कार असल्याचे म्हटले आहे. देशाच्या राजकारणात शिवसेना हा खूप मोठा चमत्कार आहे. इथल्या मराठी लोकांवरचा अन्याय दूर करण्यासाठी शिवसेनेची स्थापना केली.

सगळे म्हणत होते की मुंबई महानगर पालिका हीच शिवसेनाची सीमारेषा राहील. जेव्हा शिवसेनेची स्थापना झाली, तेव्हा लोके म्हणत होते की शिवसेना मुंबई-ठाण्याच्या पलीकडे जाणार नाही. ५-६ महिन्यात शिवसेना बंद होईल. पण ही शिवसेना महाराष्ट्रभर पसरली. राज्याच्या सीमा पार करून दिल्लीपर्यंत पोहोचली. शिवसेनेच्या आधी आणि नंतर आलेले अनेक राजकीय पक्ष काळानुरूप नष्ट झाले.

पण ज्या पद्धतीने बाळासाहेबांनी लहानातल्या लहान शिवसैनिकाला ताकद दिली, त्यामुळे शिवसेनेना आजही खोल रुजली आहेत, असे देखील ते म्हणाले आहेत. आजही शिवसेना बाळासाहेब ठाकरेंच्या विचारधारेवरच पुढे जात आहे. मराठी माणसाचा विषय शिवसेनेने दूर केलेला नाही.

हिंदुत्व आणि मराठी हे दोन्ही विषय शिवसेनेसाठी महत्त्वाचे राहिले आहेत. आज हिंदुत्वाचा बुलंद आवाज म्हटले की जगभरातल्या हिंदुंसमोर शिवसेनाच येते. शिवाय मराठी माणसाला आजही शिवसेनाच आपला आधार वाटते. असे राऊत म्हणाले आहे.

ताज्या बातम्या

धक्कादायक! मुल होत नसल्याने नवऱ्याने पत्नीला सोपावलं मांत्रिकाकडे अन् मांत्रिकाने जे केलं ते ऐकून बसेल धक्का

काय सांगता! विवाहित असलेला पुरुष गर्लफ्रेंडसोबत लिव्ह इनमध्ये राहत होता, आणि….

बाबा का ढाबा: कांता प्रसाद यांनी झोपेच्या गोळ्या खाऊन केला आत्महत्येचा प्रयत्न; प्रकृती गंभीर

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.