Infosyis ही माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील प्रसिद्ध कंपनी आहे. या कंपनीमध्ये गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांना(Investor) मोठा फटका बसला आहे. आज शेअर बाजार सुरु होताच Infosyis कंपनीचा शेअर ९ टक्क्यांनी घसरला आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांचे सुमारे ४८ हजार कोटींचे नुकसान झाले आहे, अशी माहिती गुंतवणूक तज्ञांनी दिली आहे.(infosiys compny stock fell 9 percent)
इन्फोसिसच्या गुंतवणूकदारांसाठी सोमवारची सुरुवात चांगली नाही. शेअर बाजार उघडताच इन्फोसिसचे शेअर ९% पर्यंत घसरले. ९ टक्क्यांपर्यंत शेअर घसरल्यामुळे सकाळी इन्फोसिसच्या शेअरची किंमत १५९२ रुपये होती. मिळालेल्या माहितीनुसार, २३ मार्च २०२० नंतर इन्फोसिसच्या शेअर्समधील ही सर्वात मोठी घसरण आहे.
घसरण झाल्यानंतर काही काळाने इन्फोसिस कंपनीचा शेअर सावरला. पण या घसरणीमुळे एकाच दिवसात गुंतवणूकदारांचे सुमारे ४८ हजार कोटींचे नुकसान झाले आहे. या घसरणीमुळे इन्फोसिस कंपनीचे मार्केट कॅप ६,९२,२८१ कोटी रुपयांवर आले आहे. इन्फोसिस कंपनीचे चौथ्या तिमाहीचे निकाल अपेक्षेपेक्षा कमकुवत आले आहेत.
शेअर बाजार तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, कंपनीच्या नफ्यात कपात झाली आहे. कामाचे दिवस कमी होणे हे या कपातीचे प्रमुख कारण आहे. त्याशिवाय धिक खर्च, कर्मचार्यांवर जास्त खर्च, प्रवास खर्चात झालेली वाढ यामुळे कंपनीच्या नफ्यात कपात झाली आहे. देशातील दुसरी सर्वात मोठी आयटी कंपनी असणाऱ्या इन्फोसिसने मार्च तिमाहीतील नफ्यात केवळ १२% वाढ नोंदविली आहे.
यापूर्वीच्या तिमाहीत कंपनीने नफ्यात २३% वाढ नोंदविली होती. कंपनीने जानेवारी ते मार्च २०२२ या तीन महिन्यांच्या कालावधीत ३२, २७६ कोटींचा महसूल मिळवला आहे. यापूर्वीच्या आर्थिक वर्षात इन्फोसिस कंपनीने १,००,४७२ कोटी रुपयांचा महसूल मिळवला होता. या वर्षी कंपनीने १,२१,६४१ कोटी रुपयांचा महसूल मिळवला आहे.
इन्फोसिस कंपनी यंदा ५० हजार नवोदितांना संधी देणार आहे. मागील वर्षी कंपनीने ८५ हजार नवोदितांना नोकऱ्या दिल्या होत्या. चौथ्या तिमाहीत इन्फोसिस कंपनीला २.३ अब्ज डॉलर किमतीच्या मोठ्या ऑर्डर मिळाल्या आहेत. त्यामुळे कंपनीच्या महसुलात आणखी वाढ होणार आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.
महत्वाच्या बातम्या :-
मी जेव्हा तुझ्यासोबत हॉस्पिटलमध्ये होतो तेव्हा.., हर्षल पटेलची बहिणीसाठी भावूक पोस्ट, वाचून डोळे पाणावतील
ब्रेकिंग! भोंग्यांबाबत आता राज्य सरकारने घेतला मोठा निर्णय, पोलीस प्रमुखांना दिले ‘हे’ आदेश
‘मशिदींवरील भोंग्यांच्या राजकारणावरून धर्मा-धर्मात दुही’, भाजपच्या मुंडेंनी स्वपक्षालाच सुनावले