रियाने दिलेल्या माहितीमध्ये मोठा खुलासा.. समोर आली ‘ए’ लिस्टर नावे..

मुंबई| सुशांत प्रकरण सध्या खूप नवीन वळण घेत आहे. रोज एका नवीन व्यक्तीचे नाव समोर येत आहे. सुशांतची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्ती आणि तिचा भाऊ शोविक चक्रवर्तीला एनसीबी अंतर्गत ड्रग्स प्रकरणामुळे अटक करण्यात आली आहे. एनसीबीद्वारे रियाची चौकशी चालू आहे. या चौकशीमध्ये नवनवीन खुलासे होत आहेत.

रियाने दिलेल्या माहितीनुसार जवळपास पंचवीस नावांचा समावेश आहे. ही सर्व नावे ए लिस्ट कॅटेगिरी मधील आहेत. यामध्ये प्रोडक्शन हाऊसेस,कास्टिंग डायरेक्टर, ऍक्टर, डायरेक्टर यांचा समावेश आहे. या सोबतच अनेक नावांचा समावेश आहे.

ही सर्व नावे बॉलीवूडशी संबंधित आहेत. या लिस्ट मधील सर्वजन ड्रग्स खरेदी आणि विक्री करत असल्याचे रियाने सांगितले आहे. ही नावे उच्च दर्जाची आहेत. यामुळे एनसीबी अत्यंत काटेकोरपणे चौकशी करणार आहे.

एनसीबीचे डीजी अस्थाना आणि केपीएस मल्होत्रा यांच्या उपस्थितीमध्ये दिल्लीत अंमली पदार्थ प्रकरणी बैठक झाली.पुढील तपासाबाबत या बैठकीमध्ये चर्चा झाली आहे. येत्या काही दिवसांमध्ये बॉलीवूड मधील अनेक नावे समोर येण्याची शक्यता आहे.

दरम्यान, रियाचा जमीन अर्ज हा सलग दुसऱ्यांदा फेटाळला आहे.यामुळे रियाच्या अडचणीमध्ये वाढ झाली आहे. यामुळे आता रियाच्या वकिलांनी सर्वोच्च न्यायालयात जाण्याचा निर्णय घेतला आहे.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.