आयपीएल ऑक्शनमध्ये चर्चेचा विषय ठरलेल्या शाहरूख खानबद्दल १० गोष्टी

आयपीएल लवकरच सुरू होणार असून सध्या आयपीएलचे औक्शन सुरू आहे. यावेळेस औक्शनमध्ये अनेक नवीन खेळाडू पाहायला मिळाले. प्रिती झिंटानेही या औक्शनमध्ये मोठ्या उत्साहाने भाग घेतला होता. यामध्ये एक खेळाडू होता तो म्हणजे ऑल राउंडर शाहरूख खान.

या खेळाडूला किंग्स इलेव्हन पंजाबने ५ कोटी २५ लाखांना खरेदी केला. शाहरूख खानची बेस प्राईज २० लाख रूपये होती. पण बोली लावत असताना ही रक्कम वाढतच गेली. एक वेळ अशी आली होती आरसीबीने शाहरूख खानला खरेदी करण्यासाठी पंजाबच्या बरोबरीने बोली लावली होती पण पंजाबने बाजी मारली आणि शाहरूखला खरेदी केले.

आज आम्ही तुम्हाला शाहरूख खानबद्दल १० गोष्टी सांगणार आहोत ज्या ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटेल. १) शाहरूख खानचा जन्म २७ मे १९९५ ला चेन्नई येथे झाला होता. २) बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता शाहरूख खानच्या नावावरून त्याच्या आई वडिलांनी त्याचे नाव शाहरूख खान ठेवले होते.

३) शाहरूखने खुप लहान असतानाच क्रिकेट खेळायला सुरूवात केली होती. शाळेत असताना तो डॉन बॉस्कोसाठी क्रिकेट खेळत असे. ४) शाहरूखने १३ वर्षांच्या वयात तामिळनाडू क्रिकेट असोसिएशन लीगमध्ये डेब्यू केला होता.

५) तुफानी खेळ दाखविणाऱ्या या ऑल राऊंडर खेळाडूने विजय हजारे ट्रॉफीमध्ये तामिळनाडूकडून खेळायला सुरूवात केली. ते साल होते २०१३-१४. रणजी टीममध्येही त्यांची निवड झाली होती पण त्यांनी डेब्यू फक्त २०१८-१९ ला केला होता.

६) शाहरूख खानने असा तुफानी खेळ दाखवला होता की अनेक लोक त्याचा खेळ पाहून प्रभावित आणि अवाक झाले होते. ७) त्याने २०१२ मध्ये ज्युनिअर चेन्नई सुपरकिंग्स टुर्नामेंटमध्ये धडाकेबाज खेळी दाखवून प्लेअर ऑफ द टुर्नामेंट हा खिताब जिंकला होता.

८) शाहरूख राईट हॅण्ड फलंदाज आहे आणि ऑफ ब्रेक गोलंदाज आहे. ९) सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी २०२१ मध्ये त्याची खेळी सगळ्यांनाच आवडली. या खेळीनंतर प्रत्येक ठिकाणी त्याची चर्चा होऊ लागली. पुर्ण देशातील लोक त्याला ओळखू लागले. १०) २०१४ मध्ये टी-२० क्रिकेटमध्येही त्याने डेब्यू केला होता. तेव्हा गोवाच्या विरूद्ध त्याने खुप उत्तम कामगिरी बजावली होती.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.