‘पनीर’ आवडतं म्हणून जास्त खाताय? थांबा, नाहीतर होतील ‘हे’ भयानक दुष्परिणाम

पनीर हा पदार्थ सगळ्यांच्या घरी आवर्जून खाल्ला जातो. दुधापासून तयार करण्यात आलेलं पनीर शरीरासाठी अत्यंत पौष्टिक असतं. पनीर खाण्यामुळे शरीराला प्रथिनं मिळतात. पनीरमध्ये कॅल्शियम, फॉस्फरस, पोटॅशियम, झिंक सुद्धा मुबलक प्रमाणात असतं.

परंतु कधी कधी कोणत्याही गोष्टीचा अतिरेक झाल्यावर त्याचे दुष्परिणाम आपल्याला भोगावे लागतात. आज आम्ही तुम्हाला पनीरच्या अतिसेवनाने होणारे दुष्परिणाम सांगणार आहोत. हे दुष्परिणाम कदाचित तुम्हालाही माहीत नसतील.

पनीरचे जास्त सेवन केल्याने तुमच्या शरीरात कोलेस्ट्रॉलचे प्रमाण वाढू शकते आणि जास्त प्रमाणात सेवन केल्याने तुम्हाला हृदयरोगाचा धोका देखील संभवतो. हृदयरोग झाल्यावर काय होते हे सांगण्याची गरज तुम्हाला नाही. सर्वांनाच माहीत आहे हृदयरोग झाल्यानंतर काय होते.

पनीरमध्ये सोडियमचे अर्थात मीठाचे प्रमाण खूप जास्त आहे. यामुळे, जर आपण जास्त पनीर सेवन केले तर त्यामुळे उच्च रक्तदाबाची समस्या निर्माण होऊ शकते. रक्तदाब वाढल्याने तुम्हाला हृदयविकाराचा झटका येऊ शकतो. रक्तदाब प्रमाणात ठेवण्यासाठी पनीर जास्त खाणे टाळा.

दुधापासून बनणारा पनीर प्रोटीनचा चांगला स्रोत मानला जातो. पण शरीरात प्रथिनांचे प्रमाण जास्त झाल्यास अतिसाराचा त्रास होऊ शकतो. तुमची पचनक्रिया खराब होऊ शकते. पनीर पचायला जड असते त्यामुळे जास्त खाल्याने तुम्हाला पोटात त्रास होऊ शकतो.

बऱ्याच लोकांना कच्चा पनीर खाणे फार आवडते. पण, ही फार चांगली सवय नाही. वास्तविक, कच्चे पनीर सेवन केल्याने आपल्याला संसर्गाचा धोका संभवतो. कमी प्रमाणात कच्चे पनीर खाने चांगले आहे. ही माहिती प्राथमिक स्वरूपाची असून या माहितीचा उपयोग करत असताना डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.