सर्वसामान्यांसाठी लोकल कधी सुरू होणार; मध्य रेल्वेने दिली महत्वाची माहिती..

कोरोनामुळे लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे मुंबई लोकल बंद करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला होता. त्यानंतर अनलॉकच्या प्रक्रियेत अत्यावश्यक सेवांमध्ये काम करणाऱ्या लोकांसाठी मुंबई लोकल सुरु करण्यात आली. त्यानंतर हळूहळू वकील, शिक्षक आणि महिला यांना लोकलमधून प्रवास करण्याची परवानगी देण्यात आली. त्यानंतर सर्वसामान्यांसाठी लोकल रेल्वे प्रवास कधी सुरू होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

दरम्यान मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक संजीव मित्तल यांनी सर्वसामान्यांसाठी लोकल सूरू करण्याबाबत म्हत्त्वाची माहिती दिली आहे. ते म्हणाले की, राज्य सरकार रेल्वे प्रशासन यांमध्ये चांगला समन्वय साधत आहे. रेल्वे प्रशासन सर्वसामान्य नागरिकांसाठी लोकल सेवा देण्यास तयार आहे. फक्त आम्हाला राज्य सरकारच्या परवानगीची गरज आहे त्यांची परवानगी आल्यानंतर तात्काळ लोकल सूरू केली जाईल.

तसेच ते पुढे म्हणाले की, लोकलमध्ये सातत्याने गर्दी होत असते. कोरोनाचा फैलाव गर्दीत जास्त होतो. त्यामुळे राज्य सरकारला काळजी वाटत असेल. लॉकडाऊनच्या आधी १७७४ लोकल मध्य रेल्वेकडून चालवल्या जात होत्या. त्यापैकी नियम पाळून आता फक्त १५८० लोकल गाड्या धावत आहेत. असं त्यांनी सांगितलं.

महत्वाच्या बातम्या
३३ वर्षापुर्वी अयोध्येतील राममंदीरासाठी चांदीची विट पाठवणारा शिवसेनेचा ढाण्या वाघ आनंद दिघे
आणखी एका प्रसिद्ध अभिनेत्रीने केली आत्मह.त्या; त्याआधी फेसबुक पोस्ट करत म्हणाली…
गडकिल्ले संवर्धनासाठी ठाकरे सरकारने तिजोरी उघडली; शिवनेरीसाठी दिला कोट्यावधींचा निधी
‘असा एकही दिवस जात नाही शीतल…’ लेकीच्या आठवणीत डॉ. विकास आमटे भावुक

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.