असा क्रिकेटर जो खेळपट्टीवर आला की तिकीटाची किंमत दुप्पट व्हायची, वाचा डब्लू जी ग्रेस यांच्याबद्दल..

आज आम्ही तुम्हाला अशा खेळाडूबद्दल सांगणार आहोत जो खेळपट्टीवर आला की तिकीटांची किंमत दुप्पट व्हायची. आजही इंग्लंडमधील क्रिकेट मैदानाच्या दारावर असे लिहिले आहे – क्रिकेट मैच एडमिशन ३ पेन्स, इफ डब्ल्यू जी ग्रेस प्लेज एडमिशन ६ पेन्स.

म्हणजेच क्रिकेट सामना पाहण्यासाठी 3 पेन्स (इंग्रजी नाणी), डब्ल्यूजी ग्रेस खेळल्यास ६ पेन्स. आता तुम्हाला समजले असेलच की आम्ही ‘डब्ल्यूजी ग्रेस’ यांच्याबद्दल बोलत आहोत ज्यांना ‘फादर ऑफ क्रिकेट’ म्हटले जाते. बऱ्याच लोकांना त्यांच्याबद्दल माहिती नाही. आज आम्ही तुम्हाला त्यांच्याबद्दल माहिती सांगणार आहोत.

जगाला आधुनिक क्रिकेट काय असते ते दाखवले
डब्ल्यूजी ग्रेस यांचा जन्म लंडनमधील ब्रिस्टल येथे १८४८ मध्ये झाला होता. शानदार अष्टपैलू खेळाडू – एक शानदार फलंदाज, एक हुशार गोलंदाज, एक आश्चर्यकारक फील्डर व्यतिरिक्त, कधीकधी ग्रेसला ‘चॅम्पियन’ आणि कधीकधी ‘डॉक्टर’ या टोपणनावाने ओळखले जात असे, परंतु त्यांची सर्वात मोठी ओळख म्हणजे त्याची लांब दाढी.

आधुनिक क्रिकेट ही डब्ल्यूजी ग्रेसची देणगी आहे. किंवा दुसर्‍या शब्दांत सांगायचे तर, ग्रेस क्रिकेटचा निर्माता आहे. त्या दिवसांत जेव्हा काही मोजके कसोटी सामने खेळले जात होते तेव्हा ग्रेसने वयाच्या ३२ व्या वर्षी कसोटी कारकीर्दीची सुरुवात केली. जो इंग्लंडचा त्यांच्या भूमीवरील पहिला कसोटी सामनादेखील होता. १८८० मध्ये ओव्हल येथे खेळल्या गेलेल्या कसोटीत ग्रेसने १५२ धावा केल्या.

बाद होने त्यांना आजिबात आवडत नव्हते
फलंदाजी करताना ग्रेस यांच्याकडे एक कला होती ती म्हणजे त्यांना गोलंदाज कसा चेंडू फेकणार आहे हे लगेच कळायचे. आल्फ्रेड शॉ एकदा त्याच्याबद्दल म्हणाले होते, ‘मी माझ्या पद्धतीने जिथे पाहिजे तेथे चेंडू फेकायचो पण हा म्हतारा माणूस कसाही चेंडू फेकला तरी त्याला ग्राउंडच्या बाहेर घालवायचा’ ग्रेस हे खुप मुडी होते.

त्यांना कधीही बाद होणे आवडत नव्हतें. त्यांच्याशी निगडीत एक किस्सा देखील आहे की ते कदाचित क्रिकेट जगातील पहिला फलंदाज होते ज्यांनी गोलंदाजी करताना बाद झाल्यानंतर बेल्स पुन्हा स्टंपवर ठेवल्या आणि आपला खेळ चालू ठेवला होता.

खरंतर, गोलंदाजीनंतर त्यांनी परत बेल्स पुन्हा स्टंपवर ठेवल्या होत्या आणि पुन्हा खेळायला सुरूवात केली. कोणीही त्यांच्याशी वाद घालण्याची हिम्मत केली नव्हती. शरारती ग्रेस यांना उडणाऱ्या पक्षांना दगड मारण्याची सवय होती. याच सवयीमुळे त्यांची फिल्डींग आणि बॉलिंग सुधारली होती.

वयाच्या ५१ व्या वर्षी शेवटची टेस्ट मॅच खेळली
जेव्हा ग्रेस यांनी शेवटची कसोटी खेळली तेव्हा ते ५१ वर्षांचे होते. २२ कसोटींमध्ये ग्रेस यांनी ३२.२९ च्या सरासरीने १०९८ धावा केल्या. ज्यामध्ये त्यांनी दोन शतकेही केली आणि २६.२२ च्या सरासरीने ९ बळी घेतले. प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये ग्रेसने ३९.४५ च्या सरासरीने ५४,२११ धावा केल्या, त्यामध्ये १२४ शतकांचा समावेश आहे.

त्याशिवाय राऊंड आर्म गोलंदाजी करताना त्यांनी १८.१४ च्या सरासरीने एकूण २८०९ विकेट्स घेतल्या आणि त्यानंतर ओव्हर आर्म स्लो आणि मिडीयम-स्लो लेग ब्रेक गोलंदाजी केली. या दरम्यान त्यांनी ४९ धावा देऊन डावातील सर्व १० विकेट घेण्याचा पराक्रमही केला.

या कारणामुळे त्यांना लोक म्हणायचे डॉक्टर
त्याचे वडील हेनरी मिल ग्रेस डॉक्टर होते आणि त्यांना आपल्या मुलाला डॉक्टर बनवायचे होते. तर १८६८ मध्ये ग्रेस ब्रिस्टल मेडिकल कॉलेजमध्ये दाखल झाले. सतत क्रिकेट खेळल्यामुळे त्यांना मेडीकलची परिक्षा पास होण्यासाठी ११ वर्षे लागली. ते कॉलेजमध्येसुद्धा क्रिकेटच खेळायचे आणि त्यांचे अभ्यासात आजिबात लक्ष नव्हते. तेव्हापासून त्यांना डॉक्टर म्हटले गेले.

ग्रेस आपल्या २२ कसोटी सामन्यांपैकी शेवटच्या १३ सामन्यात इंग्लंडचे कर्णधार होते. २३ ऑक्टोबर १९१५ ला पहिल्या महायुद्धात केंट येथे हवाई हल्ल्यात हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर तीन दिवसांनी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले होते.

ग्रेस यांनी केलेले अद्भुत कारनामे
प्रथम श्रेणी क्रिकेटमधील पहिले दोन तिहेरी शतके करणारे पहिले खेळाडू. प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये ५० हजार धावा पूर्ण करणारा पहिला क्रिकेटर. प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये शतक ठोकणारा पहिला फलंदाज असे अनेक विक्रम त्यांच्या नावावर होते.

इंग्लंडमध्ये पहिले शतक ठोकण्याच्या विक्रमाशिवाय डेब्यूवर शतक ठोकणारा पहिला इंग्लिश क्रिकेटपटू हा विक्रमही त्यांच्या नावावर होते. त्यामुळे त्यांना फादर ऑफ क्रिकेट म्हटले जाते. तुम्हाला ही माहिती कशी वाटली आम्हाला कळवा. जर ही माहिती आवडली असेल तर पुढे पाठवायला विसरू नका.

महत्वाच्या बातम्या
तुम्हाला माहिती आहे का भारताच्या पहिल्या लेडी डॉक्टरचे नाव? वाचा त्यांच्याबद्दलचा हा खास लेख
दिपीका लवकरच देऊ शकते गुड न्युज? रणवीर-दिपीकाला हॉस्पिटलबाहेर स्पॉट करताच चर्चांना उधान
काय सांगता! चक्क कुत्रा चालवतोय सायकल, तुम्हीही व्हाल अवाक, पहा व्हिडिओ
काय सांगता! चक्क कुत्रा चालवतोय सायकल, तुम्हीही व्हाल अवाक, पहा व्हिडिओ

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.