AIIMS चे संचालक रंदीप गुलेरिया यांची माहिती; भारताला कोरोना लसीची गरज नाही, पण…

दिल्ली | कोरोना व्हायरसने जगभरात अनेक लोकांचे जीव गेले. भारतातही सध्या तीच परिस्थिती आहे पण कोरोना हळूहळू आटोक्यात येत असल्याचे चित्र दिसत आहे. AIIMS ने याबाबत माहिती दिली आहे.

AIIMS चे म्हणणे आहे की, कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावामुळे आपण अशा परिस्थितीत पोहोचू जिथे herd immunity येईल आणि आपल्याला कोरोना लसीची गरजच भासणार नाही.

असे ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सचे संचालक डॉ. रणदीप गुलेरिया म्हणाले आहेत. जर कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला आणि व्हायरसमध्ये काही बदलच झाला नाही तर लोक कोरोना लस घेण्याबाबत विचार करतील.

पण त्याची गरजच पडणार नाही कारण बाजार आणि रस्त्यावर गर्दी वाढत चालली आहे. लोक या आजाराला सर्दी खोकल्यासारखे साधारण आजार समजू लागले आहेत. लोकांच्या या निष्काळजीपणाचा त्यांच्या तब्येतीवर खूप परिणाम होणार आहे.

एकतर ही लस बाजारात यावी आणि आली तर सर्वात जास्त जोखीम घेणाऱ्या लोकांनाच ती दिली जावी. इन्फेक्शन लवकर होणाऱ्या किंवा ज्यांना इन्फेक्शनचा धोका जास्त आहे अशा लोकांना जर ही लस दिली तर आपण कोरोनाला रोखण्यात यशस्वी होऊ शकतो.

यादरम्यान आपली रोगप्रतिकारकशक्ती वाढेल तसेच आपली इम्युनिटी चांगली होईल. लोकांना कळेल की आपल्यामध्ये आता रोगप्रतिकारकशक्ती आलेली आहे असे डॉ. रंदीप गुलेरिया यांनी म्हटलं आहे.

महत्वाच्या बातम्या- 

‘बाई आज तुमची खूप उणीव भासतेय’, आईच्या आठवनीत शरद पवार व्याकूळ; पहा काय म्हणताहेत

मनसे स्टाईल! असा उमेदवारी अर्ज दाखल करणाऱ्या पहिल्याच उमेदवार, वाचा सविस्तर…

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.