तुम्हीही करू शकता निळ्या रंगाच्या केळीची शेती, वाचा निळ्या रंगाच्या केळीचे आश्चर्यकारक फायदे

आपल्याला केळ म्हणलं की पिवळ्या रंगाचे पिकलेले केळ किंवा हिरव्या रंगाचे कच्चे केळ आठवते. मात्र बऱ्याच लोकांना माहिती नाही की निळ्या रंगाचेही केळी असतात. पिवळ्या रंगाची केळी जवळपास खुप लोक खातात. त्याचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत.

पिवळ्या केळींनी वजन वाढण्यास मदत होते. पण तुम्हाला वाचून आश्चर्य वाटेल की निळ्या रंगाचे केळे असते आणि त्याचे अनेक आश्चर्यकारक आरोग्यासाठी फायदे आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, या केळीची शेती कमी तापमान असलेल्या थंड प्रदेशात केली जाते.

सध्या दक्षिण पुर्व आशिया आणि दक्षिण अमेरिकेत या केळीची शेती केली जाते. फ्लोरिडा, कॅलिफोर्निया, टेक्सास आणि लुइसियाना येथे या केळींचे सर्वाधिक उत्पादन केले जाते. हे केळ वेगवेगळ्या देशांमध्ये वेगवेगळ्या नावाने ओळखले जाते.

हवाईमध्ये याला आईस्क्रीम बनाना म्हणतात. फिजीमध्ये हवाईय बनाना म्हणतात. फिलीपीन्समध्ये क्री नावाने हे केळ ओळखले जाते. तसेच या केळीला ब्लू जावा बनानासुद्धा म्हणतात. सोशल मिडीयावर या निळ्या केळीविषयी अनेकांनी आपले मत मांडले आहे.

एकाने या केळीविषयी म्हटलं आहे की या केळीची चव अगदी व्हॅनिला आईस्क्रीम सारखी लागते. तसेच ही केळी खाण्याचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत. जसे की ही केळी खाल्याने बद्धकोष्टता कमी करते, जर शरीरात लोहाची कमतरता असल्यास ही केळी खाल्याने ही कमतरता भरून निघते.

तसेच ही निळी केळी पचन संस्थेला तंदरूस्त बनवतात. तसेच आपली पोटाच्या अनेक समस्यांपासून या केळींनी सुटका मिळते. ही केळी भारतात काही ठिकाणी मिळतात. जर तुम्हाला ह्या केळांची शेती करायची असेल तर तुम्हाला यासाठी या केळांची माहिती काढावी लागेल आणि भारतात कोणकोणत्या ठिकाणी याची शेती केली जाते याची माहिती काढावी लागेल.

महत्वाच्या बातम्या
‘..जा तुमची स्वप्न पुर्ण करा’, भावाच्या निधनावरून ट्रोल करणाऱ्यांना निक्की तंबोलीने फटकारले
का करते मेकअपला विरोध?; साई पल्लवीने सांगितले ‘No MAKE-Up’ निर्णयाचे खरे कारण
महिलांच्या या सवयीवरून त्यांना मिळाली बिझनेसची भन्नाट आयडिया, आता आहे हजारो कोटींचा मालक
‘रात्रीस खेळ चाले’ मधील अण्णा नाईक यांच्या खऱ्या पत्नी अभिनेत्रीपेक्षाही दिसतात सुंदर; पहा फोटो

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.