सत्तेवर आल्यापासूनची मोदी सरकारची सर्वात खराब कामगिरी; ७२ टक्के जनता म्हणतेय…

मुंबई | नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यापासून देशातील महागाई नियंत्रणाबाहेर गेल्याचे एका सी व्होटर सर्वेतून समोर आले आहे. अर्थसंकल्पाच्या पार्श्वभूमीवर आयएएनएस-सी व्होटरने एक सर्व्हे केला होता. या सर्वेनुसार २०१४ नंतर पहिल्यांदाच आर्थिक आघाडीवर सरकारची कामगिरी इतकी खराब झाल्याचे समोर आले आहे.

आयएएनएस-सी व्होटरने केलेल्या सर्वेनुसार, मोदी सरकार सत्तेत आल्यापासून महागाईत नियंत्रणाबाहेर गेल्याचं ७२.१ टक्के लोकांना वाटते आहे. २०१५ मध्ये हेच प्रमाण १७.१ टक्के होते. मोदींच्या कार्यकाळात वस्तू आणि सेवांच्या किमती कमी झाल्याचं मत केवळ १०.८ टक्के व्यक्त केले होते.

याचबरोबर मोदी सरकारची कामगिरी अपेक्षापेक्षा चांगली असल्याचे फक्त ३१.७ टक्के जणांना वाटते. गेल्या १० वर्षांतील ही सर्वात वाईट कामगिरी असल्याचे देखील यामुळे समोर आले आहे.

या सोबतच मागील एका वर्षांच्या कालावधीत सर्वसामान्य माणसाच्या जीवनमानाचा दर्जा घसरला असल्याचे ४८.४ टक्के नागरिकांना वाटते आहे. तर दुसरीकडे सर्व्हेत सहभागी झालेल्या २८.८ टक्के जणांना जीवनमानाचा दर्जा सुधारल्याचे वाटत आहे.

महत्त्वाच्या बातम्या 

महिलावर्गासाठी खुशखबर! अर्थमंत्र्यांनी केली महत्त्वाची घोषणा; घेतला ‘हा’ निर्णय
‘विरुष्का’च्या लेकीचं झालं बारसं; नाव वाचून आश्चर्य वाटेल…
मोठी बातमी! कोरोना लसीकरणासाठी अर्थमंत्र्यांनी केली मोठी घोषणा; म्हणाले..

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.