Share

अंबानींनी खरेदी केली आलिशान कार; कारवर जेवढा टॅक्स भरलाय त्यात ३/४ कार येतील

industrialist-mukesh-ambani-new-car.j

भारतातील सर्वात श्रीमंत उद्योगपती आणि रिलायन्स इंडस्ट्रीजचे मालक मुकेश अंबानी(Mukesh Ambani) यांनी एक नवीन कार खरेदी केली आहे. उद्योगपती मुकेश अंबानींची ही कार सध्या चर्चेत आहे. Rolls Royce hatchback नावाच्या या नवीन कारची किंमत तब्बल १३ कोटी रुपये आहे. या नवीन कारचा व्हीआयपी नंबर मिळवण्यासाठी मुकेश अंबानी यांनी लाखो रुपये खर्च केले आहेत.(industrialist mukesh ambani buy new car)

ब्रिटिश( British) लक्झरी कार निर्मात्या कंपनीची ही गाडी आहे. या कारची खूप वैशिष्ट्ये आहेत. या अल्ट्रा-लक्झरी कारचे इंजिन सर्वश्रेष्ठ मानले जाते. या कारची वैशिष्टय़े जाणून घेतल्यास सामान्य माणूस आश्चर्यचकित झाल्याशिवाय राहत नाही. आरटीओ अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, मुकेश अंबानी यांची नवीन कार भारतामधील सर्वात महागडी कार आहे.

Rolls Royce hatchback कारचे मॉडेल नाव Rolls Royce Cullinan आहे. Rolls-Royce Cullinan मॉडेलची ही कार पेट्रोलवर चालते. या कारची ३१ जानेवारी रोजी दक्षिण मुंबईतील( South Mumbai) ताडदेव प्रादेशिक परिवहन कार्यालयात नोंदणी करण्यात आली होती. ही कार २०१८ मध्ये लाँच झाली होती. त्यावेळी या कारची मूळ किंमत ६.९५ कोटी रुपये होती.

वाहन उद्योगातील तज्ञांच्या मते, काही बदलांमुळे या कारच्या किंमतीत लक्षणीय वाढ झाली आहे. रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडचे ​​अध्यक्ष मुकेश अंबानी यांनी त्यांच्या नवीन कारसाठी व्हीआयपी क्रमांक घेतला आहे. नवीन नंबर घेण्यासाठी त्यांनी १२ लाख रुपये खर्च केले आहेत. इतकी मोठी रक्कम फक्त व्हीआयपी क्रमांक घेण्यासाठी खर्च केल्यामुळे मुकेश अंबानी यांची सर्वत्र चर्चा होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, उद्योगपती मुकेश अंबानींच्या कारचा नंबर ०००१ आहे. साधारणपणे व्हीआयपी क्रमांकाची किंमत ४ लाख रुपये असते, परंतु सध्याच्या मालिकेत निवडलेला क्रमांक यापूर्वीच घेतला गेला होता. त्यामुळे तो क्रमांक अधिक महाग झाला. या व्हीआयपी क्रमांकासाठी उद्योगपती मुकेश अंबानी यांना १२ लाख रुपये भरावे लागले.

या कारचे वजन २.५ टनांपेक्षा जास्त आहे. या कारसाठी रोल्स रॉइस कंपनीने ‘टस्कन सन’ रंगाची निवड केली आहे. या कारमध्ये ५६४ bhp पॉवर असलेले १२ सिलेंडर इंजिन आहे. या कारसाठी खास नंबर प्लेटही निवडण्यात आली आहे. या कारची नोंदणी ३० जानेवारी २०३७ पर्यंत वैध आहे. उद्योगपती मुकेश अंबानीं यांनी या कारसाठी नोंदणी शुल्क म्हणून २० लाख रुपयांचा कर भरला आहे. या कारसाठी ४० हजार रुपये रस्ता सुरक्षा कर म्हणून भरले गेले आहेत.

महत्वाच्या बातम्या :-
३ वर्षापुर्वीची खुन्नस? शिवसेना नेत्याच्या हत्येचे गूढ उकलले; तपासातून धक्कादायक माहिती आली समोर
अरे बापरे! भारतात सापडली सोन्याची सर्वात मोठी खाण, निघणार टनावारी सोने
आता टॅटूचं काय करायचं? सामंथाच्या अंगावर आहेत तीन टॅटू, एकाचं कनेक्शन आहे थेट नागा चैतन्यशी

आर्थिक

Join WhatsApp

Join Now