रशिया(Russia)-युक्रेन(Ukren) युद्धामुळे सध्या गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. रशियाने युक्रेनमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले केले आहेत. या हल्ल्यांमुळे युक्रेनमधील अनेक शहरे उद्ध्वस्त झाली आहेत. शेकडो लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. यादरम्यान एका रशियन उद्योगपतीने राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन(Vladimaar Putine) यांना अटक करणाऱ्याला साडे सात कोटी रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे.(industrialist give offer to russian soldiers)
या रशियन उद्योगपतीचे नाव एलेक्स कोनानीखिन असं आहे. एलेक्सने रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्याबद्दल एक पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली आहे. ही पोस्ट सध्या तुफान व्हायरल होत आहे. एलेक्स कोनानीखिन यांनी शेअर केलेल्या पोस्टमध्ये राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांचा फोटो देखील आहे.
या फोटोच्या कॅप्शनमध्ये एलेक्सने ‘मृत किंवा जिवंत’ असे लिहिले आहे. या पोस्टमध्ये एलेक्सने पुढे लिहिले आहे की, “मी वचन देतो की जो कोणी आपले घटनात्मक कर्तव्य बजावेल आणि पुतीनला रशियन आणि आंतरराष्ट्रीय कायद्यानुसार युद्ध गुन्हेगार म्हणून अटक करेल. मी त्या अधिकाऱ्याला एक लाख डॉलर इनाम देईन.”
एलेक्सने ही पोस्ट लिंक्डीनवर लिहिली होती. एलेक्स कोनानीखिनने पोस्टमध्ये पुढे लिहिले आहे की, “पुतीन हे रशियाचे राष्ट्राध्यक्ष नाहीत. त्यांनी विशेष ऑपरेशनचा भाग म्हणून रशियामधील अनेक अपार्टमेंट्स, इमारती उडवून दिल्या आहेत. त्यानंतर त्यांनी निवडणूक सुद्धा घेतली नाही. त्यांनी कायद्याचे पालन केले नाही. ”
पुतीन यांनी आपल्या विरोधकांची हत्या केली, असा आरोप रशियन उद्योगपती एलेक्सने केला आहे. “मला रशियाला नाझीवाद आणि त्याच्या प्रभावापासून अलिप्त ठेवायचं आहे. रशियन नागरिक असल्याने माझं ते कर्तव्य आहे.मी युक्रेनची मदत करणार आहे”, असे एलेक्सने सांगितले आहे. यापूर्वी देखील एलेक्स कोनानीखिन आणि रशियन सरकार यांच्यामध्ये वाद झाले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, एलेक्सने मॉस्को फिजिक्स आणि टेक्निकल इन्स्टिट्यूटमध्ये शिक्षण घेतले आहे. परंतु त्याच्या शिक्षणावर बंदी घालण्यात आली. यानंतर त्यांनी स्टुडंट कन्स्ट्रक्शन कोऑपरेटिव्हची सुरूवात केली. त्यानंतर बँकिंग आणि रिअल इस्टेटसारखे अनेक उद्योग त्यांनी केले आहेत. वयाच्या २५व्या वर्षी त्यांच्याकडे १०० फर्म होत्या.
महत्वाच्या बातम्या :-
‘मलिकांनी हसीना पारकरला ५ लाख दिले, ५५ लाख ही टायपिंग मिस्टेक’, ईडीच्या वकीलांचा खुलासा
ना घोडा, ना गाडी, ना कार, थेट स्ट्रेचरवर नवरदेव पोहोचला लग्नमंडपात, वाचा लग्नाची भन्नाट गोष्ट
‘पावनखिंड’ चित्रपटाला मिळालेले प्रेम पाहून भारावून गेला चिन्मय मांडलेकर; म्हणाला, ‘आम्ही धन्य झालो’