मोठी बातमी! ऑक्सिजनचा काळाबाजार केल्याप्रकरणी बड्या उद्योगपतीस अटक

नवी दिल्ली । गेल्या काही दिवसांपासून देशात कोरोनाग्रस्तांना ऑक्सिजन कमी पडत आहे. यामुळे अनेक ठिकाणी रुग्णांचे मृत्यू देखील होत आहेत. असे असताना आता ऑक्सिजनचा काळा बाजार होत असल्याचे समोर आले आहे. धक्कादायक म्हणजे यामध्ये बड्या उद्योगपतीचा समावेश आहे.

दिल्लीत शहरातील प्रसिद्ध उद्योगपती नवनीत कालरा हा देखील ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटरचा काळाबाजार करत असल्याची माहिती समोर आली आहे. पोलिसांनी टाकलेल्या छापामारीत ५०० पेक्षा जास्त कॉन्सेन्ट्रेटर हाती लागले आहेत.

या छापेमारीतूनच नवनीत कालरा यांचे नाव समोर आले आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. पोलीस गस्तवर असताना नेगे जू रेस्टॉरंट अँण्ड बार सुरु असलयाचे त्यांच्या निदर्शनास आले. यामुळे पोलिसांनी चौकशी केली .

तेथे एक व्यक्ती ऑक्सिन कॉन्सेन्ट्रेटरची ऑनलाईन ऑर्डर घेत होता. पोलिसांना हे सगळे संशयास्पद वाटले. त्यांनी रेस्टॉरंट पिंजून काढले. त्यानंतर ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर गँगचा भंडाफोड झाला.

यामुळे पोलिसांनी नवनीत कालरा यांना अटक केली. ते दिल्लीतील प्रसिद्ध व्यवसायिक आहेत. दयाल ऑप्टिकल्स, खान चाचा, नेगे अँण्ड जू, टाऊन हॉल रेस्टोरंट-बार आणि मिस्टर चाऊ या सगळ्या हॉटेल्समध्ये पार्टनर आणि त्यांच्या मालकिचे असल्याचे समोर आले आहे.

देशात ऑक्सिजनचा तुटवडा जाणवत असता या घटना दिवसेंदिवस समोर येत आहेत. कोरोनाच्या औषधामध्ये देखील काळा बाजार केला जात असल्याचा घटना समोर येत आहेत.

ताज्या बातम्या

कोरोनाने हिरावला गरिबांचा डॉक्टर; पाठोपाठ आईनेही सोडला जीव; जामखेडवर शोककळा

राखी सावंतचा मोठा खुलासा, डॉनने केली मारहाण आणि दिली पळवून नेण्याची धमकी

६ वर्षांपूर्वी विराट कोहलीने पाहिलेले ‘ते’ स्वप्न आज झाले पूर्ण, सर्व भारतीयांसाठी ठरला आनंदाचा क्षण

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.