सिंधू नदी पुन्हा भारताचा भाग बनेल, अरबी समुद्राला सिंधूसागर हेच नाव योग्य- भगतसिंग कोश्यारी

मुंबई । राज्याचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी सतत चर्चेत असतात. कधी ते मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधतात. त्यांनी रखडवलेल्या १२ आमदारांच्या नियुक्तीमुळे देखील ते चर्चेत असतात. आता त्यांच्या एका वक्तव्यामुळे ते पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. यामुळे चर्चा रंगली आहे.

मुंबईमध्ये सिंधू नदी पाणीवाटपाच्या समस्येवरील दोन पुस्तकांच्या प्रकाशनाच्यावेळी ते बोलत होते. यावेळी त्यांनी मुंबईतील अरबी समुद्राच्या नामांतराबाबत मोठे वक्तव्य केले आहे. ते म्हणाले, भौगोलिक परिस्थिती ही नेहमी बदलत असते, त्यामुळे सिंधू नदी पुनश्च भारताचा भाग असेल, असे भगतसिंग कोश्यारी यांनी म्हटले आहे.

तसेच मुंबईतील अरबी समुद्राला वास्तविक सिंधुसागर हेच नाव सार्थ आहे, असेही वक्तव्य त्यांनी केले आहे. त्यांच्या हस्ते दोन पुस्तकांचे प्रकाशन करण्यात आले, सिंधू नदी हा केवळ भौगोलिक प्रश्न नसून भारताच्या दृष्टीने त्याला सांस्कृतिक, ऐतिहासिक व आध्यात्मिक परिमाण आहेत.

ही नदी भारताचा भाग बनेल, मुंबईतील अरबी समुद्राला सिंधुसागर हेच नाव योग्य आहे. भारत आणि पाकिस्तान या दोन देशांमधील अतिशय संवेदनशील पाणीवाटपाच्या प्रश्नाचा इतिहास या पुस्तकात आहे. इतिहास आणि भविष्याचा वेध यामध्ये घेण्यात आला आहे.

असे असले तरी या कार्यक्रमात राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांचे वक्तव्य चर्चेत आले. याची चर्चा सध्या सगळीकडे सुरू आहे. राज्याचे राज्यपाल म्हणून त्यांची नियुक्ती झाल्यापासून राज्य सरकार आणि त्यांच्यात वाद देखील सुरू असतो.

मुंबईतील या कार्यक्रमात लेखक अशोक मोटवानी यांच्यासह अमेरिकेच्या मुंबईतील दूतावासातील अधिकारी स्कॉट टिकनॉर, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे डॉ. सतीश मोढ, डॉ. राधाकृष्ण पिल्लई, एस. बालकृष्णन, बाळ देसाई उपस्थित होते.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.