“…तर रस्त्यावर उतरून आंदोलन करणार” इंदुरीकर महाराज समर्थकांचा इशारा!

 

अहमदनगर। इंदुरीकर महाराज यांच्यावरील गुन्हा मागे घेतला गेला नाही, तर रस्त्यावर उतरून आंदोलन करण्यात येईल. असा इशारा इंदुरीकर महाराज समर्थकांकडून देण्यात आला आहे.

पुत्रप्राप्तीच्या वादग्रस्त वक्तव्याविरोधी महाराजांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाची सुनावणी आज संगमनेर कोर्टात पार पडली.

समर्थक म्हणाले की, “निवृत्ती महाराज देशमुख यांनी मांडलेली भूमिका ही वेगळी नसून हिंदू धर्मातील पवित्र ग्रंथ चरकसंहिता आणि गुरूचरित्र यामध्ये याचा स्पष्ट उल्लेख केला आहे.

महाराजांनी आपल्या कीर्तनात कुठेही स्त्रीभ्रुण हत्या किंवा स्त्री पुरूष भेदाचं समर्थन केलेलं नाहीये.” दरम्यान “तथाकथित समाजसेवकांनी फुकटच्या प्रसिद्धीसाठी महाराजांवर आरोप केले आहेत.

महाराजांनी याआधीच दिलगिरी व्यक्त केली आहे. महाराजांवर झालेला हा अन्याय सहन केला जाणार नाही. नाहीतर आम्ही आंदोलन करणार आहोत.” असा इशारा समर्थकांनी दिला आहे.

आज झालेल्या सुनावणीत इंदुरीकर महाराजांना आपले म्हणणे मांडण्याची संधी देण्यात येणार असल्याचे सांगितले आहे. येत्या ७ ऑगस्टला इंदुरीकर महाराजांना कोर्टात हजर राहण्याचे समन्स संगमनेर कोर्टाने बजावले आहे.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.