इंदोरीकर महाराज सगळ्यांना माहिती आहेत. त्यांच्या किर्तनाच्या स्टाईलमुळे ते पुर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध आहेत. पण सध्या इंदूरीकर महाराज यांच्या सासूबाईही चर्चेचा विषय ठरल्या आहेत. खुप कमी लोकांना माहिती आहे की, त्या नुकत्याच सरपंच पदाच्या निवडणूकीत जिंकल्या आहेत.
त्यांनी विखे पाटील आणि थोरातांच्या गटाचा पराभव केला आहे. अपक्ष निवडणूक लढवूनही त्यांनी विजय मिळवला आहे. अशातच त्या आता भाजपमध्ये सामिल होणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. इंदूरीकर महाराजांच्या सासू शशिकला पवार या संगमनेर तालुक्यातील निळवंडे ग्रामपंचायतीतून निवडून आल्या आहेत.
या निवडणूकीत दणदणीत विजय मिळवला आहे. त्या आता सरपंचपदी विराजमान झाल्या आहेत. आता त्या कोणत्या पक्षात जातील असा प्रश्न गावकऱ्यांना पडला होता. पण आता शशीकला पवार यांनी स्वताच जाहीर केलं आहे की, त्या भाजप नेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासोबत जाणार आहेत.
त्यांनी या निवडणूकीत राधा कृष्ण विखे पाटील गटाचाच पराभव केला होता. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या सोबत गावच्या विकासासाठी जाऊ असं वक्तव्यही शशीकला पवार यांनी केलं. त्यामुळे त्या भाजपमध्ये जाणार असल्याचं निश्चित झालं आहे. दरम्यान, हे बऱ्याच जणांना माहिती नव्हतं की, त्या इंदोरीकर महाराजांच्या सासू आहेत.
इंदोरीकर महाराज हे कीर्तनाने प्रबोधन करत असतात. त्यांचं खरं नाव काशिनाथ देशमुख असं आहे. अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील इंदोरी असे त्यांच्या गावाचे नाव आहे त्यामुळे ते इंदोरीकर महाराज म्हणून फेमस आहेत. त्यांच्या गावाच्या नावावरूनच त्यांचं इंदोरीकर महाराज असं नाव पडलं.
त्यांचा विनोदी अंदाज सर्वांना माहिती आहे. सोशल मिडीयावर त्यांच्या कीर्तनाचे व्हिडीओ नेहमी व्हायरल होत असतात. बऱ्याच वेळा ते त्यांच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळेही चर्चेत आले आहेत. त्यांच्या व्हायरल झालेल्या सोशल मिडीयावरील व्हिडीओजला लाखोंच्या घरात व्ह्युज असतात. त्यांचे लाखो चाहते आहेत.
महत्वाच्या बातम्या
पुण्यात चौथीतील मुलीने सांगितले आजोबांचे घाणेरडे कारनामे, म्हणाले, मुझे गोद में बिठाकर..
‘जम्मूची स्पीडगन’! उमरान मलिकने टाकला भारताचा आतापर्यंतचा सर्वात वेगवान चेंडू, स्पीड होता तब्बल..
सल्ला ऐकला ते झाले मालामाल; १० हजाराचे झाले १५ कोटी, वाचा कशी झाली ही कमाल
हिंदू मुली म्हणजे काय खेळणं आहेत का? लव्ह जिहादच्या मुद्द्यावर शेलार आक्रमक, ठाकरेंना दोष देत म्हणाले…