इंदुरीकर महाराज हाजीर हो! संगमनेर न्यायालयात हजर होण्याचे आदेश

 

अहमदनगर। पुत्र प्राप्तीसाठी सम-विषम फॉर्म्युला सांगणारे प्रसिद्ध कीर्तनकार इंदुरीकर महाराज यांच्याविरोधात PCPNDT कायद्यानुसार संगमनेर न्यायालयात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाची पहिली सुनावणी आज झाली.

या सुनावणीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले होते. आता इंदुरीकर महाराजांना आपले म्हणणे मांडण्याची संधी देण्यात आली आहे. येत्या ७ ऑगस्टला इंदुरीकर महाराजांना कोर्टात हजर राहण्याचे समन्स संगमनेर कोर्टाने बजावले आहे.

प्रसिद्ध कीर्तनकार ह.भ.प निवृत्ती महाराज देशमुख ( इंदुरीकर ) यांनी कीर्तनातून वादग्रस्त वक्तव्य केले होते. या वादग्रस्त वक्तव्यामुळे त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

इंदुरीकर महाराज यांच्या विरोधात संगमनेर शहर वैद्यकीय अधिकारी भास्कर भवर यांच्या फिर्यादीवरून संगमनेर कोर्टात PCPNDT अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे इंदुरीकर समर्थक आता आक्रमक झाले आहेत.

इंदुरीकर समर्थकांनी काही दिवसांपूर्वी संगमनेर तहसील कार्यालयात निवेदन देऊन गुन्हा मागे घेण्याची मागणी केली आहे. जर इंदुरीकर महाराजांवरील गुन्हा मागे घेतला नाही, तर रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचा इशारा समर्थकांनी दिला आहे.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.