पहिली मिस इंडिया झालेली इंद्राणीने भारताची संस्कृती जपण्यासाठी बिकिनीवर लावली होती टिकली

 

 

आजकाल मुलींच्या कलागुणांना वाव मिळावा, त्यांना व्यासपीठ मिळावे यासाठी पालक धडपड करताना दिसून येतात. इतकेच नाही, तर समाजातूनही त्या मुलींना प्रोत्साहन दिले जाते. जेव्हा मुली फॅशन विश्वात प्रसिद्ध होतात, तेव्हा आई-वडिलांसोबतच समाजाकडून तिची पाठ थोपटली जाते.

अशात पुर्वी एककाळ असाही होता, जेव्हा मुली जर फॅशनविश्वात प्रसिद्ध होत असतील, तर त्या मुली कुटूंबाच्या प्रतिष्ठेला काळिमा फासणाऱ्या आहे, अशी लोकांची विचारधारा होती.

अशा स्थितीत एका २२ वर्षीय महिलेने कुंकू लावून पांढरा शुभ्र गजरा घालून रॅम्प वॉक केले होते. सौंदर्य क्षेत्रामध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावर पडणारे पहिले पाऊल तेच होते. त्या महिलेच्या धाडसामुळेच पुढे भारताला सुश्मिता सेन, लारा दत्ता अशा विश्वसुंदरी मिळाल्या. चला तर जाणून घेऊया कोण होती ती महिला…

भारताकडून पहिल्या विश्वसुंदरी स्पर्धेसाठी अधिकृतपणे ज्या महिलेची निवड झाली होती, तिचे नाव इंद्राणी रहमान. इंद्राणी त्यावेळी २२ वर्षांची लग्न झालेली महिला होती. तसेच ती एका मुलीची आईदेखील होती.

इंद्राणी मुळची मद्रासची होती. तिची आई अमेरीकन आणि वडील भारतीय असल्याने कुटूंबाची स्वतंत्र विचारधारा होती. तिच्या स्वभावाने ती बंडखोर आणि सामाजिक बंधने न पाळणारी मुलगी होती.

१५ वर्षे वय असताना ती जगविख्यात स्थापत्यविराशद हबिब रहमान यांच्या प्रेमात ती पडली. हबिब यांचे वय इंद्राणीच्या वयाच्या दुप्पट होते. इंद्राणीने कधीही आपले प्रेम जगापासून लपवले नव्हते. इंद्राणीने त्यावेळी सगळ्यांसमोर हबिब यांच्याशी विवाह देखील केला होता.

इंद्राणीला नृत्याची प्रचंड आवड होती. तिने चार प्रकारचे क्लासिकल डान्स शिकले होते. वयाच्या पाचव्या वर्षीपासूनच तिने भरतनाट्यम शिकण्यास सुरुवात केली होती. या सर्व नृत्यांमध्ये ती पारंगत झाली होती.

इंद्राणीला जेव्हा मिस कलकत्ता घोषित करण्यात त्यानंतर तर तिचे आयुष्यच बदलून गेले. त्यानंतर ती एक दिवस भारतसुंदरी स्पर्धेत सहभागी होण्यासाठी मुंबईसाठी रवाना झाली. तेव्हा या स्पर्धेला देशभरातून विरोध होत होता.

संयोजकांनी ग्वाही दिल्याप्रमाणे सर्व स्पर्धक साड्यांवर होते. अखेर मुंबईचे तत्कालीन मेयर ए. के. पाटील यांनी मोठ्या विजेतीच्या नावाची घोषणा केली. तेव्हा २२ वर्षीय इंद्राणी पहिली मिस इंडीया ठरली होती. तेव्हा तिला मिळालेल्या प्रसिद्धीतून ती बावरली होती.

त्यानंतर तिला सौंदर्य स्पर्धेपासून लांब जायचे होते, पण तितकीच ती त्या स्पर्धांकडे खेचली जात होती. त्यानंतर जेव्हा पहिली विश्वसुंदरी स्पर्धा आयोजित तेव्हा भारताकडून ऑफिशियल एंट्री म्हणून इंद्राणीची निवड झाली होती.

जगभरातील ३० निवडक सौंदर्यवतींमध्ये इंद्राणीच्या निवड झालेली होती. या स्पर्धेत स्विमिंग सुट बंधनकारक होते. त्यावेळी बिकीनी घालून इंद्राणीने केसांचा आंबाडा बांधला होता आणि त्याला गजरा बांधलेला होता. तिने कपाळाला टिकलीही लावली होती.

या स्पर्धेनंतर मात्र तिने सौंदर्य स्पर्धांना रामराम ठोकत, पुन्हा एकदा आपल्या नृत्याच्या कलेकडे वाटचाल सुरु केली. इंद्राणीच्या धाडसामुळेच त्यानंतर स्त्रियांनी काळाच्या पुढे जाण्याचा विचार करायला सुरुवात केली होती.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.