सध्या सुरु असलेल्या विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात अजित पवार यानी केलेल्या वक्तव्या वरुन नवा वादंग पहायला मिळत आहे. राजकारण्यांनी इतिहासाबद्दल काही विधान केल्यानंतर वाद निर्माण होणे हे काही राजकीय वर्तुळात नविन नाही. यातच अजित पवार यांच्या छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दल केलेल्या विधनाने राजकीय वातावरणात चांगलेच पडसाद पहायला मिळताय.
राज्याचे विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी सुरु असलेल्या विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात छत्रपती संभाजी महाराज हे धर्मवीर नसून स्वराज्यरक्षक आहेत असे वक्तव्य केले होते. यावर सर्वत्र चर्चा होतांना दिसत आहे. अजित पवारांच्या वक्तव्याला आक्षेप घेत संभाजीराजे बोलले आहेत.
ते यावर म्हणाले की, ‘छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्य स्थापन केले आहे. आणि स्वराज्याला संरक्षण देण्यासाठी छत्रपती संभाजी महाराज, छत्रपती ताराराणी, छत्रपती राजाराम महाराज यांनी त्याचे रक्षण केले. त्यामुळे छत्रपती संभाजी महाराज हे धर्मरक्षकसुद्धा आहेत.’
अजित पवार म्हणाले होते की,’सर्वत्र छत्रपती संभाजी महाराज यांना स्वराज्यरक्षक म्हणून संबोधले जाते. परंतु काही लोकं धर्मवीर म्हणून देखील संबोधतात. तर छत्रपती संभाजी महाराज हे धर्मवीर नसून स्वराज्यरक्षक आहेत कारण त्यांनी धर्मावरुन राज्य केले नव्हते.’
मी माझ्या भाषणात संभाजीराजेंना धर्मवीर म्हणून संबोधतो आणि या नंतरही संबोधणार. कारण तसे अनेक पुरावे उपलब्ध आहेत. अजित पवार नेमके कोणते पुस्तक वाचून फक्त स्वराज्यरक्षक संबोधताय ते त्यांनी सांगावे’ असेही संभाजीराजे यांनी म्हटले आहे.
या वादात आता इतिहास अभ्यासक देखील बोलू लागले आहेत.बसंभाजीराजे यांनी धर्मवीर ही पदवीच योग्य असल्याचे सांगून अजित पवार यांच्यावर निशाणा साधला आहे. इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत यांनी याबाबत आपली भूमिका मांडली आहे. संशोधक इंद्रजीत सावंत यांनीच संभाजीराजे यांच्यावर उलट सवाल केला आहे.
ते म्हणाले,’संभाजीराजे छत्रपती हे शंभूराजे यांना धर्मवीर ही पदवी लावू नका असे याआधी म्हटले होते. त्या ऐवजी स्वातंत्रवीर म्हणा असे अनेकदा त्यांच्या भाषणात यापुर्वी म्हटले आहे. आता संभाजीराजेंना सनातन की महाराष्ट्र धर्माची अपेक्षा आहे’ असा प्रश्न केला आहे.
संभाजीराजे हे शाहू महाराजांचे वारस आहेत तर मग त्यांनी महाराष्ट्र धर्म चालवावा असा त्यांचा संदेश अपे त असावा. असेही इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत यांनी म्हटले आहे.
महत्वाच्या बातम्या
ajit pawar : …तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जेलमध्ये जातील का? अजित पवार भरसभागृहात भडकले
ajit pawar : छत्रपती संभाजी महाराज धर्मवीर नव्हते, त्यांना जाणीवपूर्वक…; अजित पवार स्पष्टच बोलले
ajit pawar : अजित पवारांनी काढली उद्धव ठाकरेंच्या मागणीतील हवा, राऊतांनाही सुनावले खडे बोल; म्हणाले…