Amit Shah : देशभरात इंडिगो (Indigo Airlines) कंपनीच्या उड्डाण रद्दप्रकरणामुळे हजारो नागरिक अडचणीत सापडलेले असताना, भाजप (BJP Party Leaders) नेत्यांनी मात्र चार्टर्ड विमानातून आरामदायी प्रवास केल्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले. सामान्य प्रवासी तासन्तास विमानतळावर अडकले होते, त्याच वेळी नेते सुखाने फ्लाईट करत असल्याने लोकांच्या भावना भडकल्या. याच मुद्यावर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah Leader Delhi) यांनी संबंधित नेत्यांना चांगलेच सुनावल्याचे सूत्रांकडून समोर आले आहे.
गेल्या आठवड्यात इंडिगो (Indigo Flights Issue) कंपनीने कर्मचाऱ्यांच्या कमतरतेमुळे शेकडो उड्डाणे रद्द केली. देशातील विविध विमानतळांवर गर्दी कोसळली, अनेकांनी रात्रभर प्रतीक्षा केली. अशा कठीण परिस्थितीत भाजपचे विधान परिषद गटनेते प्रवीण दरेकर (Pravin Darekar BJP Leader), आमदार प्रसाद लाड (Prasad Lad BJP MLA) आणि नेत्या चित्रा वाघ (Chitra Wagh BJP Leader) यांनी नागपूरकडे चार्टर्ड फ्लाईटने रवाना होत घेतलेले फोटो स्वतःच सोशल मीडियावर शेअर केले. या फोटोमुळे आधीच त्रस्त असलेल्या जनतेत संतापाची लाट उठली आणि प्रकरण थेट दिल्लीतील वरिष्ठ नेत्यांपर्यंत पोहोचले.
इंडिगो संकटाचा मोठा फटका
इंडिगोच्या उड्डाण रद्द केल्यामुळे देशभरात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. पायलट आणि केबिन क्रूंसाठी डीजीसीएने दिलेल्या नव्या विश्रांती आदेशांमुळे कंपनीला अचानक कर्मचारी तुटवडा भासू लागला. परिणामी विमानतळांवर अफरातफर, रांगा आणि प्रवाशांची प्रचंड गैरसोय झाली.
त्याच वेळी चार्टर्ड फ्लाईटमधील फोटो समोर आल्याने भाजप उच्च कमांड संतापले. सूत्रांच्या माहितीनुसार केंद्रीय संघटन मंत्री बी. एस. संतोष यांनी प्रकरणाची नोंद घेतली, तर अमित शहा यांच्या कार्यालयाने संबंधितांना थेट इशारा दिला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीदेखील नागपूरमध्ये पोहोचलेल्या चित्रा वाघ आणि प्रसाद लाड यांना शब्दांनी सज्जड धारेवर धरल्याचे सांगितले जाते.
इंडिगो संकटाचा फटका सामान्यांना बसत असताना नेत्यांनीच विलासी प्रवास करणे पक्षासाठी मोठा ‘इमेज’ संकट ठरू नये यासाठी नेतृत्वाने वेळेत हस्तक्षेप केला असल्याचे म्हटले जात आहे.






