पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या दरांपासून दिलासा मिळणार, लवकरचं स्वदेशी पेट्रोल-डिझेल येणार

नवी दिल्ली | पेट्रोलच्या वाढत्या दरांमुळे सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले आहे. दररोज पेट्रोलचे भाव गगनाला भिडत चालले आहेत. त्यामुळे वाहनचालकांच्या खिशाला कात्री लागली आहे. वाढत्या पेट्रोलच्या दरामुळे मोदी सरकारविरोधात जनतेचा रोष पहायला मिळत आहे.

पेट्रोल शंभरी गाठण्याच्या जवळ आहे आणि असे असतानाच केंद्रीय राज्यमंत्री आश्विनी कुमार चौबे यांनी वकत्व्य केले आहे. पेट्रोल डिझेलचे दर दिवसेंदिवस वाढत चालले असल्यामुळे केंद्र सरकार यावर नियंत्रण आणण्याचा प्रयत्न करत आहे. यावेळी ते राजधानी दिल्लीत पत्रकारांशी बोलत होते.

पुढे म्हणाले की, लवकरचं केंद्र सरकार स्वदेशी पेट्रोल-डिझेल बाजारात आणण्याचा प्रयत्न करत असल्याचं सांगितलं आहे. तसेच देशातच पेट्रोल डिझेलची निर्मिती करता येईल यावर काम सूरू असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

दरम्यान पेट्रोल शंभरीच्या घरात चाललेलं आहे. यावर आता केंद्रीय मंत्र्यांनीच स्वदेशी पेट्रोल-डिझेल वाहनचालकांना मिळणार असल्याने वाहनचालकांना याबाबत कितपत दिलासा मिळतोय हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
महत्वाच्या बातम्या-
‘माझ्या मुलीला ड्रग्ज प्रकरणात भाजपच्या मोठ्या नेत्याने अडकवलं’
सुशिक्षित बेरोजगार! शिपाई पदाच्या अवघ्या १३ जागांसाठी २७००० उच्च शिक्षितांचे अर्ज
ब्रेकिंग न्युज! पुण्यात उद्यापासून पुन्हा कडक निर्बंध, वाचा काय सुरू आणि काय बंद राहणार
खुशखबर! फास्ट टॅगमध्ये पैसे असतानाही स्कॅन झाला नाही तर पैसे देऊ नका, वाचा नवा नियम

 

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.