Dussehra Gathering : एकनाथ शिंदेंनी शिवसेनेशी बंडखोरी करत भाजपसोबत आपले सरकार स्थापन केल्यामुळे शिवसेनेचे दोन गट निर्माण झाले आहेत. या दोन्ही गटांना दररोज कुठल्या ना कुठल्या वादाला तोंड द्यावे लागत आहे. यातलाच एक वादाचा मुद्दा म्हणजे शिवसेनेचा दसरा मेळावा.
गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेल्या शिवसेनेच्या दसरा मेळाव्यावरून शिंदे आणि ठाकरे गटातील वाद दररोज ताणला जात आहे. दोन्ही गटातील नेत्यांच्या एकमेकांवर टीका काही केल्या संपताना दिसत नाही. दसरा तोंडावर आला असताना शिवाजी पार्कवर कोणाचा दसरा मेळावा होणार? हा प्रश्न अजून कायम आहे.
आता दसरा मेळाव्याच्या प्रकरणावर शिवसेना नेते लक्ष्मण हाके यांनी एक वक्तव्य केले आहे. यावेळी त्यांनी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला आहे. शिंदे गटाने त्यांचा दसरा मेळावा गुवाहाटीला घ्यावा, असा सल्ला त्यांनी दिला आहे.
लक्ष्मण हाके म्हणाले की, दसरा मेळावा घेण्यासाठी जर आम्हाला शिवतीर्थ मिळाले नाही, तर उद्धव साहेब जिथे उभे असतील तिथेच दसरा मेळावा सुरु होईल. तसेच त्यानंतर उद्भवलेल्या कायदा सुव्यवस्थेची संपूर्ण जबाबदारी ही एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या ईडी सरकारची असेल. ती जबाबदारी शिवसेनेची असणार नाही, असे विधान त्यांनी केले आहे.
तसेच शिंदे गटाचे मुंबईत काम नाही. त्यांनी त्यांचा दसरा मेळावा गुवाहाटी, सुरत किंवा गोव्याला घ्यावा, असा टोलाही लक्ष्मण हाके यांनी लगावला आहे. यावर्षी शिवसेनेचा दसरा मेळावा हा शिवतीर्थावरच होणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.
शिवाजी पार्कच्या परवानगीसाठी दोन्ही गटांकडून महापालिकेकडे अर्ज करण्यात आला होता. मात्र, महापालिकेने दोन्ही गटाची परवानगी नाकारली आहे. त्यामुळे शिवसेनेने आता कोर्टात धाव घेतली आहे. आता कोर्टात याप्रकरणावर काय निर्णय होतो?, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
महत्वाच्या बातम्या
uddhav thackeray : दसरा मेळावा शिवतीर्थावरच होणार; उद्धव ठाकरेंनी थोपटले दंड अन् मुख्यमंत्री शिंदेंना फुटला घाम
Uddhav Thackeray : दसरा मेळावा शिवतीर्थावरच होणार, परवानगी न मिळाल्यास बाळासाहेबांची ‘ही’ आयडीया वापरणार उद्धव ठाकरे
politics : आमचा दसरा मेळावा बघायला बाळासाहेबांचा आत्मा येईल; शिंदे गटातील नेत्याचे खळबळजनक वक्तव्य
Shivsena : परवानगी मिळो ना मिळो दसरा मेळावा शिवतीर्थवरच होणार’, शिवसैनिक आक्रमक