भारताचा जुना मित्र येणार मदतीला; भारताला देणार कोरोना लसीचे १० कोटी डोस

कोरोनाने जगात हाहाकार माजवला आहे. जगात खूप ठिकाणी कोरोना लसींवर काम सुरू आहे. पण रशियाचा दावा आहे की त्यांनी कोरोनावरील लस तयार केली असून त्याचे सकारात्मक परिणाम दिसून आले आहेत. रशियात झालेली स्पुटणीक व्ही ही लस लवकरच भारताला मिळणार आहे.

भारतीय कंपनी डॉ. रेड्डीज लॅबोरेटरीजला लसीचे १० कोटी डोस विकण्याची तयारी रशियन सोव्हेरजियन वेल्थ फंडनं दर्शवली आहे. स्पुटनिक व्ही लस परदेशात पाठवण्याची तयारी रशियाने केली आहे. रशियन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट फंडने भारतीय कंपन्यांसोबत ३० कोटी डोस तयार करण्याचा निर्णय घेतला आहे.

३० कोटी डोसची निर्मिती भारतात केली जाईल. भारतातील अग्रगण्य फार्मा कंपनी असलेली डॉ. रेड्डीज लॅबोरेटरीज यांनी माहिती दिली आहे की, स्फुटणीक व्ही या लसीची तिसऱ्या टप्प्यातील चाचणी भारतात घेणार आहे. चाचणी झाल्यानंतर नियामक संस्थेकडे त्याची नोंद केली जाईल.

चालू वर्षाच्या अखेरीस भारतात स्पुटनिक व्ही लस निर्यात केली जाईल. कोरोनावरील लसीची नोंदणी करणारा रशिया हा पहिला देश आहे. तिसऱ्या टप्प्यातील चाचण्या व्यापक प्रमाणात पूर्ण होण्याच्या आधीच रशियाने लसीची नोंदणी केली आहे. त्यामुळे लसीच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

स्पुटनिक व्ही लसीच्या पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यातील चाचणीचे परिणाम सकारात्मक होते अशी माहिती जी व्ही प्रसाद यांनी दिली आहे. कोरोनाविरुद्धच्या लढाईत स्पुटनिक व्ही विश्वासार्ह पर्याय असेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.