उद्या सादर होणार भारताचं पहिलं सोशल मीडिया ॲप Elyments; उपराष्ट्रपतींच्या हस्ते होणार लॉन्चिंग

 

नवी दिल्ली | जर तुम्ही मेड इन इंडिया सोशल मीडिया ॲपच्या शोधात असताल तर तुमच्यासाठी चांगली बातमी आहे. उद्या पाच जुलैला देशातील पहिले सोशल मीडिया ॲप एलाईमेंट्स लॉन्च होणार आहे.

विशेष म्हणजे हे अँप उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांच्या हस्ते लॉंच केले जाणार आहे. भारतात पन्नास करोड पेक्षाही जास्त लोक सोशल मीडियाचा वापर करत असूनही अधिकतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर विदेशी कंपन्यांचे अधिपत्य आहे.

एलाईमेंट्स ॲपला एक हजार पेक्षाही अधिक आयटी प्रोफेशनल मिळून तयार केले आहे.एलाईमेंट्स भारतात बनलेलं पहिलं सोशल मीडिया सुपर ॲप आहे.

एलाईमेंट्स हे ॲप आधीपासूनच गुगल प्ले स्टोअरवर उपलब्ध असून एक लाख पेक्षा अधिक लोकांनी याला डाउनलोड केल आहे. पण अधिकारीकरीत्या या ॲपचे पाच जुलैला उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांच्या हस्ते लॉन्चिंग केले जाणार आहे.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.