धक्कादायक! अवघ्या ३३ व्या वर्षी भारताच्या वेगवान गोलंदाचा मृत्यू

हैदराबाद | भारताच्या क्रिडा क्षेत्राला मोठा धक्का बसला आहे. ऐन तारूण्यात एका वेगवान गोलंदाजाला आपला जीव गमवावा लागला आहे. आपल्या वेगवान गोलंदाजीने छाप पाडणाऱ्या ३३ वर्षीय अश्विन यादव या खेळाडूचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला आहे.

अश्विन हा हैदराबादमध्ये स्थानिक क्रिकेट लीगमध्ये खेळत उत्कृष्ट कामगिरी करायचा. त्याने २००७ मध्ये मोहालीमध्ये रणजी ट्रॉफी सामन्यातून पदार्पण केले होते.

अश्विनच्या मृत्यूनंतर क्रिकेट क्षेत्रातून हळहळ व्यक्त केली जात आहे. अनेक खेळाडूंनी दु:ख व्यक्त केले आहे. अश्विनसोबत खेळणारा खेळाडू स्पिनर विशाल शर्मा आणि भारतीय संघाचे फिल्डिंग कोच आर श्रीधर यांनी ट्विट केले आहे.

आर श्रीधर म्हणाले, अश्विनच्या जाण्याने मला मोठा हादरा बसला आहे. एक हसतमुख खेळाडू आपल्यातून निघून गेला आहे. देवाकडे प्रार्थना करतो की ईश्वराने हा आघात सहन करण्याची ताकद त्याच्या कुटूंबाला देवो.

अश्विनचा सहकारी खेळाडू स्पिनर विशाल शर्मा म्हणाला, अश्विच्या चेहऱ्यावर कायम हसू असायचे. तो नाराज कधी व्हायचा नाही. स्थानिक लीगमध्ये खुप उत्तम खेळायचा. मला विश्वास बसत नाही की तो आता या जगात राहिला नाही.

अश्विनने २००९ मध्ये मुंबईविरुध्द अखेरचा सामना खेळला होता. हैद्राबादकडून खेळताना १४ प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये ३४ विकेट घेतल्या होत्या. त्याचबरोबर अश्विनने १० लिस्ट ए सामने खेळत ४ विकेट घेतल्या होत्या. २००८ आणि २००९ मध्ये दिल्ली विरुध्द अवघ्या ५२ धावा देऊन ६ विकेट घेतल्या होत्या.
महत्वाच्या बातम्या-
ड्रामा क्वीनचा नवा ड्रामा! पीपीई किट घालून अभिनेत्रीने केली भाजी खरेदी; पाहा व्हिडिओ
कंगणा म्हणते, पंंतप्रधान मोदी देशासाठी पित्यासमान आहेत; पंतप्रधान म्हणजेच देश आहे
कोरोनाची दुसरी लाट कधी ओसरणार?; आयआयटीच्या शास्त्रज्ञांनी सांगितली तारीख

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.