या भारतीय कंपनीने लॉन्च केला देशातील सर्वात स्वस्त फोन, किंमत वाचून थक्क व्हाल

सणासुदीच्या काळात जर तुम्हाला फोन घ्यायचा असेल तर तुम्ही त्याची सुरुवातीची किंमत किती ठरवाल? पण सध्या भारतात आतापर्यंतचा सगळ्यात स्वस्त फोन लॉन्च झाला आहे. आता ही गोष्ट खरी आहे की, बरेच लोक हा फोन स्मार्टफोन नाहीये म्हणून दुर्लक्ष करतील.

पण हा एक फिचर फोन आहे जो तुम्ही कोणालाही गिफ्ट करू शकता. कारण अजूनही बरेच लोक असे फोन्स वापरतात. इलेक्ट्रॉनिक प्रोडक्ट बनवणारी कंपनी detel ने हा फोन लॉन्च केला आहे.

D1 गुरू असे या फोनचे नाव आहे. ह्याची किंमत फक्त ६९९ रुपये आहे. यामध्ये १६ जीबीची मेमरी आहे जी वाढवता येऊ शकते. तसेच फ्लॅशलाईट, जीपीएस आणि बीटी डायलरसारखे स्मार्ट फीचर्स यामध्ये आहेत.

नेव्ही ब्लु आणि ब्लॅक कलरमध्ये हे फोन उपलब्ध होणार आहेत. जर स्पेसिफिकेशन बघायचे झाले तर यामध्ये १.८ एलसीडी डिस्प्ले, डुएल फ्लैशलाइट, ऑडियो और वीडियो प्लेयर, डिजिटल कैमरा, वायरलेस एफएम, पावर सेविंग मोड, एसओएस आणि १००० एमएएच बॅटरी सारखे दमदार फीचर्स आहेत.

यामध्ये एक इन्स्टंट मेसेजिंग अँप आहे ज्याचे नाव आहे झेड टॉक. ज्याच्या मदतीने तुम्ही कोणालाही सोप्या पद्धतीने मेसेज किंवा फोटो पाठवू शकता. D1 गुरू बेस्ट साऊंड आणि म्युसिक व या किंमतीत खूप चांगले फीचर्स देत आहे.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.