मुंबई | देशात कोरोना विषाणूचा हाहाकार सुरु आहे. अशा परिस्थितीत सर्वांचे लक्ष कोरोना लसीकडे लागले आहे. दिलासादायक बाब म्हणजे फायजर, मॉडर्ना, ऑक्सफर्ड-एस्ट्राजेनेका, स्पुटनिक व्ही या लसी शेवटच्या टप्प्यात आहेत. यामुळे आता लवकरच कोरोना लस बाजारात येईल अशी माहिती मिळत आहे.
याच पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी जनतेला लवकरच लस मिळेल असे आश्वासन दिले आहे. याबाबत बोलताना डॉ. हर्षवर्धन म्हणाले, ‘येत्या काही महिन्यांत भारतीयांसाठी अत्यंत सुरक्षित, प्रभावी कोरोना प्रतिबंधक लस उपलब्ध होईल असे त्यांनी सांगितले आहे.
तसेच पुढे ते म्हणाले, येत्या जून-जुलै महिन्यापर्यंत भारतातील ३० कोटी नागरिकांना कोरोना लस टोचली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.
मॉडर्ना लस कोरोनावर १००% प्रभावी…
अमेरिकेतील मॉडर्ना कंपनीने कोरोना लशीबाबत एक दिलासादायक माहिती दिली आहे. ट्रायलमध्ये आपली लस ९४.१ % परिणामकारक असल्याचे मॉडर्नाने सांगितले आहे. तर गंभीर कोरोनावर ही लस १०० टक्के प्रभावी ठरली असल्याचा असा दावा देखील करण्यात आला आहे.
याबाबत मॉडर्ना कंपनीने तिसऱ्या टप्प्यातील अहवाल जारी केला आहे. यात दिलेल्या माहितीनुसार ३०.००० लोकांवर लशीची चाचणी केली. त्यामध्ये १९६ कोरोना रुग्णांचा समावेश होता. या रुग्णांवर ही लस १०० टक्के परिणामकारक असल्याचे समजत आहे.
कोरोना लस वाटपासाठी मोदी सरकारने तयार केला प्लॅन…
कोरोना लस वेळेत सर्वसामान्यांपर्यंत पोहोचावी यासाठी केंद्र सरकार आणि राज्य सरकार आरखडा तयार करण्याच्या तयारीत आहे. सरकार प्रत्येक राज्यात ब्लॉक स्तरावर ब्लॉक टास्क फोर्स तयार करेल. याबाबत बुधवारी सरकारने मोठा निर्णय घेतला आहे.
या टास्क फोर्सच्या मदतीने प्रत्येक भागात कोरोना लस पोहचवायला मदत होईल. आरोग्य मंत्रालयाने सर्व राज्यांचे मुख्य सचिव आणि आरोग्य सचिवांना पत्र लिहून ब्लॉक टास्क फोर्स बनवण्याची सूचना दिल्या आहेत.
या फोर्समध्ये एसडीएम, तहसीलदार यांच्याव्यतिरिक्त स्थानिक विना सरकारी संघटना म्हणजेच एनजीओ, विभागातील प्रभावी व्यक्ती आणि धार्मिक नेत्यांना सहभागी करुन घेतले जाईल. याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी माहिती दिली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
चिंतेत भर! करोनाच्या लक्षणांमध्ये बदल; नाकावाटे करू शकतो मेंदूत शिरकाव; नवा निष्कर्ष
प्रताप सरनाईकांचा क्वारंटाईन कालावधी संपला; गुरुवारी ईडीसमोर हजर होणार?
शीतल यांच्या आत्मह.त्येनंतर आमटे कुटुंबाची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…