Share

कॅनडात स्वास्तिकला बंदी घातल्यामुळे भारतीयांनी रस्त्यावर उतरून केले आंदोलन, वाचा का घातली बंदी..

हिंदूंचे पवित्र प्रतीक असलेल्या स्वस्तिकावरून आता कॅनडात वाद निर्माण झाला आहे. स्वस्तिकच्या वापरावर बंदी घालण्यासाठी कॅनडाच्या संसदेत विधेयक मांडण्यात आले आहे. यामुळे इंडो-कॅनेडियन समुदाय संतप्त झाला आहे. हे प्रकरण वाढल्यानंतर भारत सरकारने कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन टुड्रो यांच्याशी चर्चा केली आहे.

कॅनडा सरकारने स्वस्तिक वर बंदी आणल्यापासून अनेकांकडून विरोध दर्शविला जात आहे. कॅनडाच्या सरकारने स्वस्तिक वरती बंदी आणण्याबाबत एक विधेयक देखील सादर केलं आहे, तेव्हापासून कॅनडा सरकारला विरोधाचा सामना करावा लागत आहे. न्यू डेमोक्रॅटिक पार्टीचे नेते जगमीत सिंह यांच्या समर्थनातील सदस्यांनी हे विधेयक आणले आहे.

कॅनडात स्वस्तिकच्या बंधनामुळे भारत- कॅनाडाई समुदायात तीव्र संघर्ष निर्माण झाला आहे. अमेरिकेतील एका प्रमुख हिंदू संघटनेनं कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन टुड्रो आणि विधेयकाचे समर्थन करणारे मूळ भारतीय वंशाचे नेते जगमीत सिंह यांच्याकडे आग्रह धरला आहे. यामध्ये, हिंदूंसाठी प्राचीन आणि शुभ प्रतीक मानण्यात येणाऱ्या स्वस्तिकला हकेनक्रेझसोबत ग्राह्य धरू नये. हकेनक्रेझ हे एक स्वस्तिक सारखे दिसणारे प्रतिमा आहे. जे विसाव्या शतकापासून वापरण्यात येत आहे. असे सांगितले.

हा मुद्दा सुरू होण्याचं कारण म्हणजे, खरं तर, कॅनडामध्ये कोविड लस अनिवार्य केल्याच्या विरोधात आणि लॉकडाऊनच्या विरोधात मोठ्या प्रमाणावर होणारा विरोध पाहता पंतप्रधान जस्टिन टुड्रो यांनी देशात आणीबाणी लागू केली.

याविरोधात कॅनडात काही दिवसांपासून ट्रक ड्रायव्हर रस्त्यावर उतरून याचा विरोध करत आहेत. कॅनडाची राजधानी ओटावा येथे आंदोलक ट्रेकचालकांनी चक्का जाम केला आहे. या आंदोलनात आंदोलकांकडून तथाकथित स्वस्तिक आणि काँन्फेडरेट झेंडे फडकवण्यात येत आहेत.

या घटनेनंतर न्यू डेमोक्रॅटिक पार्टीचे नेते जगमीत सिंह यांनी 2 फेब्रुवारी रोजी ट्विट केले होते की, “स्वस्तिक आणि काँन्फेडरेट झेंड्याला कॅनडात काहीही महत्व नाही. कॅनडात तिरस्कारांच्या प्रतिकांना प्रतिबंध करण्याची ही वेळ आहे. आपल्या सर्वांनी एकत्र येऊन हे निश्चित केले पाहिजे की, समाजात तिरस्कार आणि द्वेष भावनेला काहीही स्थान नाही.” असे सांगितले होते.

आंतरराष्ट्रीय

Join WhatsApp

Join Now