Share

स्मृती मानधना-हरमनप्रीत कौरने मोडले अनेक विक्रम, वेस्ट इंडिजला धूळ चारत भारताचा मोठा विजय

Smruti-and-Harmanpreet

महिला विश्वचषकात आज भारतीय महिला संघाने(Indian team) वेस्ट इंडिज(West Indies) संघाला धूळ चारली आहे. स्मृती मानधना आणि हरमनप्रीत कौर यांनी केलेल्या झंझावाती खेळीमुळे भारताला विजय मिळाला आहे. भारताने वेस्ट इंडिजसमोर ३१८ धावांचे लक्ष्य ठेवले होते. पण वेस्ट इंडिज संघाचा डाव ४०.३ षटकांत १६२ धावांवर आटोपला.(indian women team win against west indies)

या सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला होता. भारताची सलामी जोडी यास्तिका भाटिया आणि स्मृती मानधना यांनी या सामन्यात जोरदार सुरवात केली. त्यानंतर काही षटकातच भारतीय महिला संघाच्या तीन बळी गेले होते. यानंतर हरमनप्रीत कौरने(Harmanpreet Kaur) मैदानावर येत झंझावाती खेळी केली.

स्मृती मानधना आणि हरमनप्रीत कौर यांनी चौथ्या विकेटसाठी १८४ धावांची शानदार भागीदारी केली. या सामन्यात स्मृती मानधनाने वनडे कारकिर्दीतील पाचवे शतक झळकावले. तिने ११९ चेंडूंत १३ चौकार आणि २ षटकारांच्या मदतीने १२३ धावा केल्या. त्याचवेळी हरमनप्रीत कौरने वनडे कारकिर्दीतील चौथे शतक झळकावले. तिने १०७ चेंडूत १० चौकार आणि २ षटकारांच्या मदतीने १०९ धावा केल्या

स्मृती मानधना आणि हरमनप्रीत कौर यांनी केलेल्या भागीदारीमुळे टीम इंडियाला एवढ्या मोठ्या लक्ष्यापर्यंत पोहोचता आले. भारताने ५० षटकांत ८ गडी गमावून ३१७ धावा केल्या. प्रत्युत्तरात वेस्ट इंडिज संघाची सुरवात खराब झाली. त्यामुळे वेस्ट इंडिज संघाचा डाव ४०.३ षटकांत १६२ धावांवर आटोपला. या सामन्यात भारताने वेस्ट इंडिज संघावर १५५ धावांनी विजय मिळवला आहे.

भारतीय महिला संघाचा विश्वचषक स्पर्धेतील हा दुसरा विजय आहे. याआधी भारतीय संघाने पाकिस्तानचा १०७ धावांनी पराभव केला होता. न्यूझीलंड विरुद्धच्या सामन्यात भारतीय संघाला पराभवाचा सामना करावा लागला होता. त्यामुळे हा सामना भारतीय महिला संघासाठी महत्वाचा होता. भारतीय संघाने या सामन्यात दिमाखदार विजय मिळवला आहे.

त्याचबरोबर वेस्ट इंडिज संघाचा या स्पर्धेतील हा पहिलाच पराभव आहे. यापूर्वी वेस्ट इंडिज संघाने दोन सामने जिंकले होते. भारतीय संघात स्मृती मानधना आणि हरमनप्रीत कौर यांनी उत्तम फलंदाजी केली आहे. आता भारताचा पुढील सामना इंग्लंडशी आहे. हा सामना १६ मार्चला होणार आहे. भारतीय संघाने आतापर्यंत या स्पर्धेत दोन सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे आणि एका सामन्यात भारतीय महिला संघाचा पराभव झाला आहे.

महत्वाच्या बातम्या :-
योगी आदित्यनाथ आणि महाराष्ट्राचं ‘नाथ संप्रदाय’ कनेक्शन तुम्हाला माहिती आहे का?
तांत्रिक बिघाडामुळे भारताकडून सुटले मिसाईल, २६१ किमी अंतर ७ मिनिटांत कापत पाकिस्तानात गेले अन्…
अमेरिकेने केली रशियाची चहूबाजूंनी कोंडी; आता घेतला ‘हा’ नाक दाबणारा निर्णय

ताज्या बातम्या

Join WhatsApp

Join Now