महिला विश्वचषक स्पर्धेत मंगळवारी भारतीय महिला संघाने बांगलादेशवर(Bangladesh) शानदार विजय मिळवला आहे. भारतीय महिला संघाने बांगलादेशचा 110 धावांनी पराभव केला आहे. या विश्वचषकातील भारतीय महिला संघाचा हा तिसरा विजय आहे. या विजयामुळे विश्वचषक स्पर्धेची उपांत्य फेरी गाठण्याच्या भारताच्या आशा अजून देखील जिवंत आहेत.(indian women team win against bangladesh)
या विजयानंतर भारत गुणतालिकेत तिसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे. भारतीय संघाचे सहा गुण झाले आहेत. या सामन्यात नाणेफेक जिंकून भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारतीय संघाने 50 षटकात 7 गडी गमावून 229 धावा केल्या. भारताकडून यास्तिका भाटियाने आणि शेफाली वर्माने दिमाखदार खेळी केली.
भारतीय संघातील खेळाडू यास्तिका भाटियाने 50 धावा केल्या, तर शेफाली वर्माने 42 धावांचे योगदान दिले. बांगलादेश संघातील खेळाडू रितू मोनीने सर्वाधिक तीन बळी घेतले. भारतीय संघाने बांगलादेशला विजयासाठी 230 धावांचे लक्ष्य दिले होते. बांगलादेश संघाची सुरवात संथ झाली. सलामीवीर मुर्शिदा खातून आणि शर्मीन अख्तर यांनी 4 षटकांत केवळ 6 धावा केल्या होत्या.
डावखुरी फिरकीपटू राजेश्वरी गायकवाड हिने भारतीय संघाला पहिली विकेट मिळवून दिली. बांगलादेश संघाची खेळाडू शर्मीन अख्तरला झेलबाद केले. या सामन्यात भारतीय खेळाडू स्नेहा राणा हीने चार विकेट घेतल्या. त्यामुळे बांगलादेश संघाचा डाव 119 धावांवर आटोपला. त्यामुळे भारतीय महिला संघाने बांगलादेशचा 110 धावांनी पराभव केला आहे.
यासह भारतीय संघाने या विश्वचषकात तिसरा विजय मिळवला आहे. याआधी भारतीय संघाने पाकिस्तान आणि वेस्ट इंडिज संघाचा पराभव केला होता. तसेच भारतीय संघाला न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया संघाकडून पराभव स्वीकारावा लागला होता. या विजयासह भारतीय संघ गुणतालिकेत तिसऱ्या स्थानावर आला आहे. भारतीय संघाकडे सध्या सहा गुण झाले आहेत.
हा सामना हॅमिल्टन येथे खेळवण्यात आला होता. या विजयामुळे भारताचा रनरेट सुधारला आहे. या विजयाचा फायदा भारतीय संघाला सेमीफायनलमध्ये प्रवेश करण्यासाठी होणार आहे. या सामन्यात पूजा वस्त्राकार आणि झुलन गोस्वामी हीने प्रत्येकी दोन फलंदाज बाद केले. या सामन्यात यास्तिका भाटियाने अर्धशतक झळकावले.
महत्वाच्या बातम्या :-
‘शेर शिवराज’ चित्रपटात अफजल खानाच्या भूमिकेत दिसणार बॉलिवूडचा ‘हा’ अभिनेता
‘काश्मीर फाइल्स’ चित्रपटाच्या निर्मात्यांनी ५०% रक्कम पंडीतांना दान करावी नाहीतर…’, करणी सेनेचा इशारा
‘अमिताभसारखा मोठा सेलिब्रिटी आंबेडकरांच्या पाया लागतो हे भाजपच्या लोकांना खटकलंय का?’