भारतीय क्रिकेट संघाने मालिकेतील तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात श्रीलंकेचा मोठ्या फरकाने पराभव केला. टीम इंडियाने रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली अप्रतिम खेळ दाखवला आणि यासह मालिकेत ३-० असा क्लीन स्वीप दिला आहे.
रविवारी तिरुअनंतपुरम येथे खेळल्या गेलेल्या या सामन्यात भारताने ५० षटकात ५ विकेट गमावत ३९० धावा केल्या होत्या. यानंतर श्रीलंकेचे फलंदाज एकापाठोपाठ एक बाद होत गेले आणि त्यांच्या संघाला २२ षटकात फक्त ७३ धावाच करता आल्या.
टीम इंडियाकडून विराट कोहलीने १६६ धावांची नाबाद इनिंग खेळली. विराटने ११० चेंडूंच्या खेळीत १३ चौकार आणि ८ षटकार मारले. त्याच्याशिवाय शुभमन गिल यानेही शतक झळकावले. गिलने ९७ चेंडूत १४ चौकार आणि २ षटकारांसह ११६ धावांचे योगदान दिले. यानंतर वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजने कारकिर्दीतील सर्वोत्तम कामगिरी केली. त्याने ३२ धावांत ४ विकेट्स घेतल्या. विराटला प्लेअर ऑफ द मॅच आणि प्लेयर ऑफ द सिरीज म्हणून गौरवण्यात आलं.
सलामीवीर रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली खेळताना भारताने या सामन्यात एकदिवसीय सामन्यांच्या इतिहासात सर्वात मोठा विक्रम केला. त्याने श्रीलंकेचा ३१७ धावांच्या मोठ्या फरकाने पराभव करून एकदिवसीय क्रिकेटमधील सर्वात मोठा विजय नोंदवला. धावांच्या बाबतीत वनडेतील कोणत्याही संघाचा हा सर्वात मोठा विजय आहे. हा विक्रम करून भारतीय संघाने न्यूझीलंडला मागे टाकले.
वनडे फॉरमॅटच्या इतिहासात भारताने धावांच्या बाबतीत सर्वात मोठा विजय नोंदवला आहे. याआधी न्यूझीलंडने २००८ साली आयर्लंडचा वनडेत २९० धावांच्या फरकाने पराभव केला होता. आता भारत या यादीत अव्वल स्थानी पोहोचला आहे. त्याचवेळी ऑस्ट्रेलियाने २०१५ च्या विश्वचषकात अफगाणिस्तानविरुद्ध २७५ धावांनी विजय मिळवला होता.
याआधी, वनडेमध्ये धावांच्या बाबतीत भारताचा सर्वात मोठा विजय २००७ च्या आयसीसी विश्वचषकात झाला होता. त्यावेळी पोर्ट ऑफ स्पेनमध्ये अनुभवी राहुल द्रविडच्या नेतृत्वाखाली खेळल्या गेलेल्या सामन्यात संघाने २५७ धावांनी विजय मिळवला होता. राहुल द्रविड आता मुख्य प्रशिक्षकपदी असतानाच भारताने हा रेकॉर्ड केला आहे.
महत्वाच्या बातम्या-
‘या’ मुंबईकर खेळाडूने केला कहर; 81 चौकार, 18 षटकारांच्या मदतीने केल्या 508 धावा
‘आता वाघाच्या तोंडाला रक्त लागलय!’ विराटने लागोपाठ शतके ठोकताच चाहते फिदा, कौतूक करत म्हणाले…
विराटला नाही तर ‘या’ खेळाडूला रोहितने ठरवलं मालिकेचा हिरो; सगळ्यांसमोर म्हणाला, तो एक…