टीम इंडियाने पहिल्या कसोटी सामन्यात श्रीलंकेचा एक डाव आणि २२२ धावांनी पराभव केला. यामुळे टीम इंडियाने श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी(Test) मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. या सामन्यात भारताचा अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजाने(Ravindra Jadeja) झंझावाती खेळी करत नाबाद १७५ धावा केल्या. तसेच रवींद्र जडेजाने या सामन्यात श्रीलंकेच्या ९ विकेट्स देखील घेतल्या.(indian team captain rohit sharma statement on ravindra jadeja)
श्रीलंकेविरुद्धच्या या सामन्यात रवींद्र जडेजा द्विशतकापासून २५ धावा दूर असताना कर्णधार रोहित शर्माने टीम इंडियाचा डाव घोषित केला. यावरून कर्णधार रोहित शर्मावर खूप टीका होत आहे. कर्णधार रोहित शर्माने डाव घोषित केल्यामुळे रवींद्र जडेजाला द्विशतक पूर्ण करता आले नाही, अशी टीका सोशल मीडियावर होत आहे.
रवींद्र जडेजाचे द्विशतक पूर्ण न होण्यास कोण जबाबदार आहे, याबाबतचा खुलासा कर्णधार रोहित शर्माने केला आहे. सामना संपल्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत कर्णधार रोहित शर्माने सांगितले की, ” रवींद्र जडेजा द्विशतकापासून २५ धावा दूर असताना टीम इंडियाचा डाव घोषित करण्याचा निर्णय माझा नव्हता. हा निर्णय रवींद्र जडेजानेच घेतला होता.”
श्रीलंकेविरुद्धच्या या सामन्यात रवींद्र जडेजाला त्याच्या खेळीसाठी ‘मॅन ऑफ द मॅच’ पुरस्कार देखील मिळाला होता. यावेळी रवींद्र जडेजा म्हणाला की, “मी फलंदाजी किंवा गोलंदाजी करताना आकडेवारीकडे लक्ष देत नाही. मीच संघ व्यवस्थापनाला डाव घोषित करण्याची सूचना केली होती.”, असे रवींद्र जडेजाने पत्रकार परिषदेत सांगितले.
टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माने पत्रकार परिषदेत सांगितले की, “डाव घोषित करण्याचा निर्णय संपूर्ण संघाचा होता. त्याला रवींद्र जडेजाची देखील संमती होती. यावरून रवींद्र जडेजा किती निस्वार्थी हे दिसून येत आहे.”, असे कर्णधार रोहित शर्माने सांगितले. श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या सामन्यात रवींद्र जडेजाने अष्टपैलू खेळी करत टीम इंडियाला विजय मिळवून दिला.
या सामन्यात रवींद्र जडेजाने नाबाद १७५ धावा केल्या आणि ९ विकेट्स घेतल्या. ज्यामुळे टीम इंडियाने श्रीलंकेवर एक डाव आणि २२२ धावांनी विजय मिळवला. त्यामुळे टीम इंडियाने या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. कसोटी कर्णधार म्हणून रोहित शर्माचा हा पहिलाच सामना होता. या सामन्यात संघाने विजय मिळवल्याने कर्णधार रोहित शर्माचे कौतुक होत आहे.
महत्वाच्या बातम्या :-
‘तुम्ही सांगाल ते करायला पाकिस्तान तुमचा गुलाम आहे का?’ इम्रान खान का भडकले? वाचा..
नागराज मंजूळेंवर टीका करणाऱ्या शेफाली वैद्यांना नेटकाऱ्यांनी झापलं; म्हणाले, क्यूँ हिला डाला ना…
तीन मजली इमारतीत झाला भीषण स्फोट, ८ जणांचा मृत्यु, बॉम्ब बनवत असल्याचा शेजाऱ्यांचा आरोप