ब्रेकींग! टी-20 वर्ल्ड कपसाठी भारतीय संघाची घोषणा, धोनीसह ‘या’ खेळाडूंची झाली निवड

मुंबई । सर्वांचे लक्ष लागलेल्या टी-20 वर्ल्ड कपसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. बीसीसीआयने बुधवारी कर्णधार विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील १५ सदस्यीय संघाची घोषणा केली. यामुळे चाहत्यांना कोणाला संधी मिळणार आणि कोणाला नाही याची उत्सुकता लागली होती.

कोरोनामुळे ही स्पर्धा लांबली होती, आता १७ आक्टोबर ते १४ नोव्हेंबर या कालावधीत युएईच्या मैदानात वर्ल्ड कप स्पर्धा रंगणार आहे. भारत आणि पाकिस्तान एकाच गटात आहेत. यामुळे या सामन्याकडे जगाचे लक्ष लागले आहे. या दोन्ही संघाशिवाय न्यूझीलंड आणि अफगानिस्तान यांचाही या गटात समावेश आहे.

यामुळे याकडे आता सर्व क्रिकेट प्रेमींचे लक्ष लागले आहे. पहिल्या गटात गत वर्ल्ड चॅम्पियन वेस्ट इंडिज, इंग्लंड, ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका या संघांचा समावेश आहे. विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया या स्पर्धेत उतरणार आहे.

विराट कोहली (कर्णधार),रोहित शर्मा (उपकर्णधार), सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, ऋषभ पंत, के. एल राहुल, हार्दिक पंड्या, रविंद्र जाडेजा, शार्दुल ठाकुर,जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, भुवनेश्वर कुमार, दीपक चाहर, युजवेंद्र चहल, वरुण चक्रवर्ती यांचा टीममध्ये समावेश करण्यात आला आहे.

विशेष म्हणजे माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीचा देखील टीममध्ये मेंटर म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. यामुळे त्याचा टीमला नक्कीच फायदा होईल, आता ही स्पर्धा कोण जिंकणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

ताज्या बातम्या

पैसा जवळ टिकत नाही? जाणून घ्या, तज्ञांच्या मते पैसे वाचवण्याचे सोपे मार्ग…

‘मन उडू उडू झालं’ मधील शलाका आहे ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्रीची मुलगी; आईने केले आहे अनेक सुपरहिट चित्रपटांत आणि सुत्रसंचालीकेच काम…

अनैतिक संबंधामुळे घराची बदनामी झाल्याने, छोट्या भावाने मोठ्या भावावर केला कुदळीने वार

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.