Share

विदेशात डॉक्टरकीचे शिक्षण घेतलेले विद्यार्थी भारतात होतात नापास, मोठी माहिती आली समोर

Student

परदेशातून वैद्यकीय शिक्षण घेऊन परतलेल्या विद्यार्थ्यांना भारतात प्रॅक्टिस करण्यासाठी फॉरेन मेडिकल ग्रॅज्युएट्स एक्झाम ( एफएमजीइ ) ही परीक्षा उत्तीर्ण व्हावी लागते. पण या परीक्षेमध्ये दर दहा विद्यार्थ्यांपैकी आठ विद्यार्थी नापास होत असल्याची माहिती समोर आली आहे. युक्रेनमधून वैद्यकीय शिक्षण घेऊन आलेल्या विद्यार्थ्यांना ही परीक्षा देणे बंधनकारक असते.(indian student get medical education from abroad fail)

राष्ट्रीय परीक्षा मंडळाच्या ( एनइबी ) सूत्रांनी यासंदर्भात माहिती दिली आहे. या माहितीनुसार परदेशातून वैद्यकीय शिक्षण घेऊन भारतात परतणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या वाढत आहे. २०२० साली परदेशातून वैद्यकीय पदवी घेऊन भारतात आलेल्या ३५ हजार ७७४ विद्यार्थ्यांनी एफएमजीइ ही परीक्षा दिली होती. त्यामधील ५ हजार ८९७ विद्यार्थी ही परीक्षा उत्तीर्ण झाले.

सरासरी फक्त १६.४८ टक्के विद्यार्थी ही परीक्षा पास झाले. गेल्या सहा वर्षात १.२६ लाख विद्यार्थ्यांनी एफएमजीइ ही परीक्षा दिली आहे. त्यामधील २१ हजार विद्यार्थी ही परीक्षा उत्तीर्ण झाले आहेत. रशिया आणि युक्रेनमध्ये सध्या भयंकर युद्ध सुरु आहे. या युद्धामुळे १५ लाख नागरिक युक्रेनमधून बाहेर पडलेत, अशी माहिती यूएनच्या मानवाधिकार संघटनेने दिली आहे.

या युद्धाच्या दरम्यान रशियन सरकारने फेसबुक आणि ट्विटर या सोशल मिडीया अँपवर बंदी घेतली आहे. फेसबुक आणि ट्विटर रशियन माध्यमांच्या बातम्यांबाबत भेदभाव करत आहेत, असा आरोप पुतीन सरकारने केला आहे. त्यातूनच रशियन सरकारने ही कारवाई केली आहे. या युध्दादम्यान रशियाने युक्रेनमधील काही शहरांचा ताबा घेतला आहे.

रशियाने युक्रेनमधील खेरसन आणि बार्डियनक्स हे शहर ताब्यात घेतले आहे. या शहरांमधील नागरिक रशियन सरकारविरोधात निदर्शने करत आहेत. काही दिवसांपूर्वी रशियाने युक्रेनवर केलेल्या बॉम्ब हल्ल्यात एका भारतीय विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला होता. या मृत विद्यार्थ्याचे नाव नवीन शेखराप्पा असे होते. नवीन हा खार्किव्ह नॅशनल मेडिकल कॉलेजमध्ये एमबीबीएसच्या चौथ्या वर्षाला शिकत होता.

नवीन काही सामान आणण्यासाठी घराबाहेर पडलं होता, त्यावेळी हा हल्ला झाला होता. नवीनला बारावीला ९७ टक्के होते तरी देखील त्याला भारतात मेडिकलची सीट मिळाली नव्हती. मेडिकलचे शिक्षण घेण्यासाठी त्याला युक्रेनला जावं लागलं होत. भारतातील अनेक विद्यार्थी युक्रेनला वैद्यकीय शिक्षणासाठी जातात.

महत्वाच्या बातम्या :-
“केंद्रीय मंत्री सांगूनही आम्हाला पोलिसांनी सोडलं नाही, शेवटी अमित शहांना फोन करावा लागला”
‘फुटपाथवरली दहाबारा पोरं हे कॉम्बिनेशन नागराजने ‘फँड्री’, ‘सैराट’, ‘नाळ’नंतर.., किशोर कदमने व्यक्त केल्या भावना
VIDEO: तोंडावर जखमा असताना मराठी अभिनेता आला लाईव्ह आणि नागराज मंजुळेंचे केले कौतुक, म्हणाला..

ताज्या बातम्या

Join WhatsApp

Join Now