Share

रशियाने युक्रेनमध्ये केलेल्या हल्ल्यात निर्दोष भारतीय विद्यार्थ्याचा मृत्यु, कुटुंबावर शोककळा

Indian-student-died

गेल्या पाच दिवसांपासून युक्रेन(Ukren) आणि रशियामध्ये(Russia) भयंकर युध्द सुरु आहे. युक्रेनमध्ये रशियन सैन्याने केलेल्या हल्ल्यांमुळे परिस्थिती आता दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे. रशियाने युक्रेनमधील खार्किवमध्ये(Kharkiv) केलेल्या हवाई हल्ल्यात एका भारतीय विद्यार्थ्याचा मृत्यू झाला आहे. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची यांनी यासंदर्भातील माहिती दिली आहे.(indian student died in ukren russia war)

आज सकाळपासून रशियाने युक्रेनच्या सर्व प्रमुख शहरांमध्ये हल्ले तीव्र केले आहेत. रशियन सैन्याचा मोठा ताफा युक्रेनची राजधानी असलेल्या कीव शहराच्या दिशेने वेगाने पुढे जात आहे. आज रशियन सैन्याने युक्रेनमधील खार्किव नावाच्या शहरात हवाई हल्ला केला. या हल्ल्यात एका भारतीय विद्यार्थ्याचा मृत्यू झाला आहे.

परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची यांनी याबाबत एक ट्विट केले आहे. त्या ट्विटमध्ये अरिंदम बागची म्हणाले की, “खार्किव येथे झालेल्या हवाई हल्ल्यात एका भारतीय विद्यार्थ्याचा मृत्यू झाला आहे. ही माहिती देताना मला अत्यंत दु:ख होत आहे. सध्या मंत्रालय विद्यार्थ्याच्या कुटुंबीयांच्या संपर्कात आहे. आमच्या संवेदना कुटुंबासोबत आहेत.”

भारतीय परराष्ट्र सचिव रशिया आणि युक्रेनच्या राजदूतांच्या संपर्कात असल्याची माहिती अरिंदम बागची यांनी दिली आहे. यामध्ये भारतीय विद्यार्थी आणि नागरिकांना बाहेर जाण्यासाठी सुरक्षित रस्ता देण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली आहे. अजूनही अनेक विद्यार्थी खार्किव आणि इतर शहरांमध्ये अडकले आहेत.

युक्रेनची राजधानी असलेल्या कीवमध्ये परिस्थिती बिघडली आहे.या पार्श्वभूमीवर भारतीय दूतावासाने आज कडक सूचना जारी केल्या आहेत. सर्व भारतीय नागरिक आणि विद्यार्थ्यांनी लवकरात लवकर कीव शहर सोडावे, असे निर्देश भारतीय दूतावासाने दिले आहेत. कीव सोडण्यासाठी भारतीय विद्यार्थ्यांनी मिळेल त्या साधनाचा ताबडतोब वापर करावा, असे भारतीय दूतावासाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले आहे

भारतीय विद्यार्थ्यांनी युक्रेनमध्ये रेल्वे, बस आदींनी प्रवास करावा, असा सल्ला भारतीय दूतावासाकडून देण्यात आला आहे. काल रशिया आणि युक्रेन या दोन्ही देशांच्या अधिकाऱ्यांमध्ये महत्वपूर्ण बैठक पार पडली होती. रशिया आणि युक्रेनच्या अधिकाऱ्यांमध्ये तब्बल तीन तास ही बैठक सुरु होती. या बैठकीत युद्धाच्या पार्श्वभूमीवर चर्चा करण्यात आली होती.

महत्वाच्या बातम्या :-
१० मिनिटांच्या नियोजनातच वसंतदादा पाटलांनी फोडला होता ब्रिटीशांचा तुरुंग; वाचा थरारक किस्सा..
‘कच्चा बदाम’ फेम भुबन बड्याकर यांच्या अपघाताचे खरे कारण आले समोर, वाचा नेमकं काय घडलं..
प्रचंड पैसै असूनही मुलाला वाचवू शकले नाही मायक्रोसॉफ्टचे सीईओ, ‘या’ दुर्मिळ आजाराने झाला मुलाचा मृत्यु

ताज्या बातम्या

Join WhatsApp

Join Now